मोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य

0
नाशिक :  मोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य आहे. यासाठी महागडे मोबाईल वापरण्याची मुळीच गरज नसून फक्त मोबाईलची योग्य  हाताळणी आणि बेसिक गोष्टीचा सुयोग्य वापर करण्याची गरज असल्याचे मत प्राध्यापक फैझ उल्ला, सेंटर फॉर द स्टडी ऑफ मिडीया अॅण्ड कल्चर स्टडी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई यांनी व्यक्त केले आहे. अंकुर फिल्म फेस्टीव्हलमध्ये मोबाईल फिल्म मेकिंगची कार्यशाळा संपन्न झाली.

त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी थेट मोबाईलवर फिल्म मेकिंग आणि त्याचे एडीटींगचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

अभिव्यक्ती, मिडीया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक आयोजित हॉलमध्ये ६ वा अंकुर फिल्म फेस्टीव्हल कुसुमाग्रज स्मारकात विशाखा आणि स्वगत हॉलमध्ये सुरु आहे. यामध्ये फिल्मच्या सादरीकरणासह मोबाईल फिल्म मेकिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

सामान्यपणे महागडा मोबाईल म्हणजे चांगले शुटिंग, फोटो असे मानले जाते. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. अगदी सात आठ हजार रुपयात येणाऱ्या मोबाईलमध्येही चांगली फिल्म बनते. कारण त्या मोबाईलचा वापर कसा करतो यावर लक्ष द्यायाला हवे असे उल्ला यांनी सांगितले.

साधारपणे मोबाईलवर फिल्म बनवतांना मोबाईल हाताळतांना तो कधीही उभा धरून शूट करू नये, चित्रीकरण करतांना मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा, बॅटरी पूर्णपणे भरलेली असावी, मोबाईलमध्ये मेमेरी असली पाहिजे आणि चित्रीकरणाचा बॅंक अप घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सोबतच चित्रीकरण करतांना ट्रायपॉडचा वापर करावा जेणेकरून दृश्य स्थित टिपली जातील, चित्रीकरणाची वस्तू जवळ ठेवावी यासोबतच लाईट, आवाज या गोष्टीकडे लक्ष द्यावे. विशेष म्हणजे रूम टोन घ्यायला कधीही विसरून नये या टिप्स उल्ला यांनी दिल्या. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सोबतच गुगल मॅप बनवण्याचे धडे ही दिले.

LEAVE A REPLY

*