मानेचे सौंदर्य जपण्यासाठी हे करून पाहाच…

0

सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ, तेजस्वी चेहऱ्यासोबत सुडौल, नितळ मान, गळा हे सौंदर्य वाढविण्याचे पूरक काम करतात.

१) क्लिन्झिंग मिल्कने कापसाने मान स्वच्छ साफ करावी.यासाठी साधे दूधही वापरता येईल.यामुळे मेकअप, क्रीम इ.      साफ होईल.

२) चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटे धुवावे.

३) लिंबूरस, दूधपावडर, गुलाबपाणी एकत्र करून मानेला लावावे. वीस मिनिटांनी धुवावे. रेशमी कापडाने मान/गळा        हलकेच घासावे. त्वचा स्वच्छ, तेजस्वी होते.

४) बदाम तेल ,कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम करावे . मसाज क्रीम बोटांना लावून      हळूवारपणे मसाज करावा .

५) ओटचे जाडसर पीठ ,लिंबूरस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा . तो मसाज केलेला थर अर्धा तास ठेवून            काढावा. नंतर मॉइश्चरायझर लावावे. दही व ओटमुळे मृतपेशी निघून लिंबामुळे थोडा ब्लिचिंगसारखा फायदा मिळतो.

LEAVE A REPLY

*