Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

असा करा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक

Share

नाशिक | प्रतिनिधी

आधार कार्ड नोंदणी करतेवेळी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करातांना तो ऑफलाईन करायचा असतो . त्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डच्या डेटामध्ये अपडेट करायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीनेही करता येतो.

बँक, आयकर रिटर्न यांसाठीही आधार कार्ड अत्यावश्यक आहे. .सर्व सरकारी योजनांच्या लाभांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेल आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं झालेलं आहे.  आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असण्याचे अनेक फायदे आहेत.

आधार कार्ड धारकांना आयकर रिटर्न ऑनलाईन व्हेरिफाय करता येतो. त्याकरिता ओटीपीची गरज (वन टाईम पासवर्ड) असते. हा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर येतो. तसेच वेबसाइटवरून ई-आधार डाऊनलोड करतानाही तुम्हाला ओटीपीची गरज लागते. हा सुद्धा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर येतो.

आधार कार्ड नोंदणी करतेवेळी मोबाईल नंबर लिंक करण्याकरीता

  • आधार कार्ड नोंदणी करतेवेळी मोबाईल नंबर लिंक करण्याकरीता ऑफलाईनच करावा लागतो . त्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा.
  • तसेच अपडेट करण्यासाठी यावेळी आधार अपडेट / करेक्शन फॉर्म घेऊन जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन फॉर्म अचूकपणे भरून त्यावर मोबाईल नंबर अपडेट करत असल्याचा उल्लेख करा. यावेळी फॉर्म जमा करण्यासाठी आधार कार्डची फोटो कॉपी आणि मतदान कार्ड, पॅन कार्ड इत्यादी पैकी एक ओळखपत्र लागेल.

ऑनलाईन मोबाईल नंबर अपडेट करण्याकरीता …

  • आधार कार्डच्या डेटामध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑनलाईनही अपडेट करता येतो.
  • त्यासाठी तुमचा जुना नंबर चालू असला पाहिजे तरच तुम्ही तर नवीन नंबर ऑनलाईन लिंक करु शकता. कारण त्यासाठी लागणारा ओटीपी पहिल्यांदा लिंक केलेल्या नंबरवर पाठवला जातो.
  • परंतु जुना नंबर बदलायचा नंबर बंद असल्यास तर ऑनलाईन अपडेट करता येणार नाही. अशावेळी आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागतो.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!