ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला कसे लिंक करायचे ? मग हे वाचाच

0

नवी दिल्ली : सिमकार्ड आणि पॅनकार्डला आधार लिंक केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. ‘एखादा अपघात झाल्यावर अपघाताला जबाबदार असणारी व्यक्ती घटनास्थळावरुन पळ काढते, असे अनेकदा होते. हीच व्यक्ती नंतर ओळख लपवण्यासाठी खोटं लायसन्स मिळवते ज्यामुळे ती शिक्षेपासून वाचते’, असे रविशंकर यांनी इंडियन्स सायन्स या कार्यक्रमात सांगितले होते.

त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी जोडल्यास जेव्हा एखादी व्यक्ती नवीन लायसन्ससाठी प्रयत्न करेल तेव्हा तिच्याकडे यापूर्वीही लायसन्स होते, ही माहिती उघड होऊन नवीन लायसन्स मिळू शकणार नाही. त्यासाठी सध्या ड्रायविंग लायसन आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे. परंतु आधार लिंक कसे करायचे ? तर पुढील बातमी तुमच्यासाठी आहे.

  • सर्वात आधी sarathi.parivahan.gov.या वेबसाईटला भेट द्या. आपण ज्या राज्यातून आहोत ते राज्य निवड करा. त्यानंतर अप्लाय ऑनलाईन ला जा. पुढे Services on Driving Licence (Renewal/Duplicate/Aedl/Others) या मेनूवरती क्लीक करावयाचे आहे.
  • आता आपल्यापुढे एक नवीन विंडो आली असेल त्यामध्ये पुन्हा राज्य निवड करायचे आहे. पुढे Countinue बटनावर क्लिक करून आधार कार्ड संदर्भात माहिती द्या.
  • या स्लाइड्सवर आपल्या ड्रायविंग लायसन्स संदर्भात पूर्ण माहिती असेल. त्याखालीच आपला आधार क्रमांक आणि मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ठ करावयाचा आहे. यानंतर आपले ड्रायविंग लायसन्स अद्ययावत होईल.

अशा पद्धतीने आपले ड्रायविंग लायसन्स आधारकार्डाशी जोडले जाईल.

LEAVE A REPLY

*