आपल्या मोबाईल क्रमांकाशी अशा प्रकारे जोडा आधार कार्ड

0
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता आपला मोबाईल फोन क्रमांक आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. फेब्रुवारी १८ पर्यंत त्यासाठी मुदत आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक रद्द केला जाईल.

या पद्धतीने आपण आपला फोन क्रमांक कार्डशी जोडू शकतो.

  • तुम्हाला संबंधित मोबाईल कंपनीकडून आधारकार्डशी मोबाईल जोडण्यासाठी एसएमएस आला असेल.
  • हा एसएमएस आला असेल किंवा नसला तरीही तुम्ही मोबाईल कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला भेटा.
  • त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकासंदर्भात माहिती द्या. आधारशिवाय इतर कुठलेही कागदपत्र आपल्याकडे मागितले जाणार नाही.
  • पुरेशी पडताळणी केल्यानंतर तो आपल्या मोबाईल फोनवर एक ‘व्हेरिफिकेशन कोड’ एसएमएस करेल. हा कोड त्याला सांगून ‘कन्फर्म ’करा.
  • त्यानंतर तुमच्या हाताच्या बोटांच्या ठशांची पडताळणी केली जाईल.
  • पुढे २४ तासांच्या आत तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक ‘व्हेरिफिकेशन’कोड येईल. त्यावर आपण Y टाईप करून (YES) उत्तर पाठवा.
  • ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. त्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.

LEAVE A REPLY

*