Type to search

Featured सेल्फी

यशस्वी होण्याचे फंडे

Share
यशस्वी होण्याचे फंडे, How To Get Successful In Life

यशस्वी मंडळी हे जीवनातील यशाचे गमक जाणून असतात. त्यामुळे ते प्रत्येक क्षणाचा चांगला वापर करण्याबाबत सजग असतात. एक म्हण आहे, जी मंडळी वेळेसमवेत चालत नाही, त्याला वेळ मागे टाकते. म्हणजेच यशापासून ती मंडळी दूर जाते. अर्थात वेळेचे व्यवस्थापन करणे ही एक कला आहे. ही कला शिकण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतील असे नाही किंवा एखाद्या शिक्षण संस्थेत त्याचे शिक्षण किंवा सल्ला घ्यावा लागेल, असेही नाही.

यशस्वी मंडळी प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग कसा करायचा, हे जाणून असतात. त्यांना थोडाही वेळ गमावलेला आवडत नाही. जेव्हा एखाद्या चुकीची जाणीव होते, तेव्हा ते लगेच जबाबदारी स्वीकारतात आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. ते केवळ जबाबदारी स्वीकारत नाही तर अन्य मंडळींनाही सोबत घेतात. यशस्वी मंडळी हे स्वत:ला नेहमीच सर्वोत्तम समजतात.

श्रेष्ठ किंवा यशस्वी मंडळी स्वत:ला चांगले ओळखून असतात. आयुष्य खूप सुंदर आहे, कालचा दिवस, मागचा तास आणि गेलेला क्षण हा आपल्या आयुष्यात परत येणार नाही, हे सर्वानाच ठावूक आहे. मात्र प्रत्येक व्यक्ती वेळेचा सदुपयोग करतोच असे नाही. भांडण, द्वेष, इर्षा, राग, संताप, लोभ यात स्वत:ला अडकवत नाहीत आणि दुसर्‍याला दोष देण्यातही वेळ घालवत नाहीत. त्यामुळे यशस्वी मंडळी ही प्रत्येक क्षणाचा फायदा उचलतात.

स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे. जेव्हा आपण व्यग्र असता, तेव्हा सर्वकाही सोपे असते. मात्र आपण जेव्हा आळशी बनता, तेव्हा कोणतीच गोष्ट सोपी राहत नाही. यशस्वी मंडळी प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी पूर्ण करण्यावर आग्रही असतात. एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, मात्र एका मिनिटात घेतलेल्या निर्णयाने आयुष्य बदलू शकते, यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणून आळशीवृत्तीचे नेहमीच पिछाडीवर असतात, हे लक्षात ठेवा. एक यशस्वी व्यक्ती आपल्या सहकार्याची मनमोकळेपणाने कौतुक करत असतो. यातून प्रोत्साहन मिळते आणि जीवनातील उद्दिष्ट्ये साध्य करण्यास हातभार लागतो. कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम केवळ अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने चालला नाही तर त्यांनी प्रत्येक घटकातील व्यक्तीला कार्यक्रमात सामावून घेतले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे उमेदवारांनाही प्रेरणा मिळाली. म्हणून केवळ कौतुक केल्याने देखील अशक्य काम पूर्ण होऊ शकते. या गोष्टी यशस्वी लोक सहजपणे करतात. ते कातुक करताना संकोच बाळगत नाहीत.

यशस्वी मंडळी शिस्त आणि कठोर मेहनतीलाच यशाचा मार्ग समजतात. अशा स्थितीत आपल्या कौशल्याचा वापर करण्यापासून ते जराही मागे हटत नाहीत. यशस्वी मंडळी आयुष्यातील चढउतारांना डगमगत नाहीत प्रत्येक संकटांना ते आत्मविश्वासाने सामोरे जातात. स्वत:ला शांत ठेऊन निर्णय घेतात. कार्यालयातील अडचणी असो किंवा कौटुंबिक वाद असो, ही मंडळी सहजगत्या त्यावर मार्ग काढतात. त्यामुळे लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून संबंधात माधुर्य टिकवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!