कचऱ्यातून सोनं गोळा करून ‘त्यांची’ पेटते चूल

0

नाशिक | सगळीकडे दागिन्यांचा लखलखाट असणारा नाशिकमधील प्रसिद्ध सराफ बाजार आपल्याला माहिती असेलच. गोदामाईच्या काठी असणारा सराफ बाजार काळानुरूप बदलला पण आजही काही गोष्टी तशाच आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी या परिसरातील अनेक महिला रस्त्यावरील तसेच सोनाराच्या दुकानातील निघणारा कचरा विकत घेतात. तो कचरा धुतला जातो नंतर त्यात सोन्याचे काही अंश निघतात ते अगदी काही मिलीमध्ये असतात ते पुन्हा सोनाराला विकून त्यातून दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये कमावतात त्यातून या महिला आपला उदरनिर्वाह करतात.

नाशिकला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला असल्यामुळे याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते. गंगेच्या काठाजवळच सराफ बाजार आहे नाशिकसह अनेकजण याठिकाणी सोनेखरेदीसाठी गर्दी करत असतात.

दुकानातील हा सगळा कचरा आणि मातीचे कन महिला का गोळा करून धूत का असाव्यात? असा प्रश्न याठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकाला पडतोच. तर हे या महिलांचे उपजीविकेचे साधन असून मातीमोल असणारा कचरा या महिलांसाठी लाखमोलाची आहे असे म्हटले जाते.

असे चालते या महिलांचे काम : घरातली पुरुष मंडळी सोनारांकडून कचरा विकत आणतात. दुकानातील कचरा आणि रस्त्यावरची माती एकत्र करून घरी नेतात. आठवड्यातून एकदा घरी भट्टी लावली जाते. या भट्टीत ही माती तापवून त्यातून सोन वेगळ केल जात. जे सोनं इतकं जपून वापरलं जात, जे सहज कचऱ्यात कोणी जाऊ देणार नाही ते सोनं अस किती प्रमाणात यांना सापडत असेल?

संपूर्ण परिवाराला कमवण्याचं हे एकमेव साधन. अवघड वाटत असल तरी सत्य आहे. आपणही कधी सराफ बाजारात फिरतांना इकडे तिकडे बघा. मातीतून केवळ सोन्यासारखं पीक नव्हे तर खरोखरच सोनं सुद्धा उगवत हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही.

(संकलन : प्राची पोद्दार, शाहबाज खान, विणा कुलकर्णी, प्रणाली पंडित)

LEAVE A REPLY

*