आनंदी पालक आनंदी पिढी घडवतात !

0

सध्याची पालकाची व्याख्या काय ? जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागड्या क्लासला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले.

याने आपण आपल्या मुलाला केवळ भौतिक सुखाची व्याख्या समजावत आहोत.

आनंदी पालकच आनंदी पिढी घडवतात. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा.

स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात.

आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्‍या पालकांशी संवाद करावासा वाटत नाही.

त्यांना सुचणार्‍या नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्‍या पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असायला हवा.

जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक.

तेव्हा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का ? ‘एखाद्या जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे’, हाच पालकाचा धर्म आहे.

LEAVE A REPLY

*