Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : थाळी नको, शिक्षण द्या!; नेटकर्‍यांनी काढले सोशल वाभाडे

Share

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेने दहा रुपयांत गरिबांना पोटभर जेवणासाठी थाळी देऊ अशी घोषणा केली. त्यानंतर भाजपनेही शिवसेनेच्या घोषणेला साजेशी पाच रुपयांत थाळी देऊ अशी घोषणा केली. मात्र, नेटकर्‍यांनी या घोषणेचे सोशल वाभाडे काढत आम्हाला थाळी नको, आम्हाला दहा रुपयांत शिक्षण उपलब्ध करून द्या! जेवण कसे मिळवायचे ते आमचे आम्ही बघून घेऊ असे सांगितले.

या संदेशाचे व्यंगचित्र, सोशल मीडिया संदेश तयार करून अनेकांच्या मोबाईलमध्ये या पोस्ट गेल्या अनेक दिवसांपासून संदेशस्वरुपात मिळत आहेत. सत्ताधारी भाजप सेनेच्या घोषणांची चांदी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी केली आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये स्वार होत विरोधकांनी जाहीरनाम्याच्या घोषणेवरून सत्ताधारी पक्षांची खिल्ली उडवली.

सर्वत्र मंदीचे सावट आहे, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेक कंपन्यांचे सध्या शटडाऊन सुरू आहे. बड्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या अनेक लहान कंपन्यांची वाटचाल धोक्यात सापडली आहे. अशा परिस्थितीत सरकार यावर उपाययोजना न करता, स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देण्याची भाषा करत आहे. या मुद्याने विरोधक नेत्यांच्या सभांनीही मैदान चांगलेच गाजवलेले दिसून येते.

सोशल मीडियात फक्त व्हायरल झालेल्या गोष्टी बघितल्या जातात. मात्र, अनेक तज्ञांच्या अभ्यासानुसार, काही गोष्टी ज्या नकारात्मक किंवा सकारात्मक आहेत. त्या प्रसिद्धीसाठी व्हायरल केल्या जाऊ शकतात. त्यातीलच तंत्र विरोधकांनी वापरत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेल्या वर्गाचा अभ्यास करून अफवांच्या आणि घोषणांच्या व्हायरल बाजारात स्वार होत विरोध करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली दिसून येत नाही.

प्रसिद्धी कोण कुठे कशी करेल याचा नेम नाही.अशीच काहीशी प्रसिद्धी उमेदवारांनी केलेली दिसून येते. नाशिकमध्ये काही संस्था, प्रशासनाच्या सोबतीने मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निरखून इथेही आपण प्रसिद्धी करू शकतो याचा अंदाज घेत मतदान जनजागृती पोस्टच्या माध्यमातून उमेदवार स्वतःच मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करताना नजरेस पडून येतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!