Type to search

ब्लॉग

आजचा तरुण कसा असावा?

Share
मित्रांनो, जे जाते, पण परत येत नाही ते आहे तारुण्य! म्हणूनच सर्व संधीचा फायदा सर्व तरुणांनी घेतला पाहिजे, आपल्या पुढील आव्हाने स्वीकारली पाहिजेत. तरुण हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व नैतिकदृष्ट्या संपन्न असले पाहिजेत. चांगली माणसे आयात करता येत नाहीत, ती घडवावी लागतात. म्हणूनच घडलेल्या तरुणांशिवाय या देशाला तरोणोपाय नाही.
तरुणांचे हात उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.” तरुणांनी आपला आत्मविश्वास जागृत करायला हवा. ज्यांचा आत्मविश्वास जागृत झाला तो जीवनात यश मिळवू शकतो.
म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, “या देशाचा इतिहास म्हणजे मूठभर आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचाच इतिहास आहे. ज्यांचा आत्मविश्वास खचला त्यांचे सर्व काही व्यर्थ आहे. मूठभर आत्मविश्वास असणारे मला मिळाले तर मी या देशाचा विकास घडवून आणेल.”
मित्रांनो, आजच्या या तरुणांवर देशाचा विकास, येणारा काळ आणि निर्माण होणाऱ्या अडचणी अवलंबून असतात. म्हणूनच आजचा तरुण सरळ व ज्ञानी असावा. तरुणांना गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल याची जाणीव असावी.
समाजातील ढोंग, रुढी, भ्रष्टाचार आणि वाईट सवयी यांवर आळा घालून नवे जग निर्माण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे. तरुणांच्या जीवनाला ध्येय असले पाहिजे. ध्येयाचा ध्यास असला पाहिजे, त्यामुळे आपत्ती- आपत्तीचा त्रास होत नाही. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजे. उपनिषदांमध्ये तरुणांची लक्षणे सांगितलेली आहेत.
युवस्यात: साधू , युवा द्यासक:।। आशिष्ठी, दृढीष्ठी बलिष्ठी:।। तरुण हा साधू म्हणजे सरळ, निष्कापटी, निर्मळ आणि खिलाडू असला पाहिजे. गर्वाने झुकून न जाता यशाचा, तर सबब न सांगता अपयशाचा त्याला स्वीकार करता आला पाहिजे. ज्याला जगावे कशासाठी आणि मरावे कशासाठी हे समजते तोच तरुण.
व्यसनांच्या आहारी जाऊ नये. व्यसन हा माणसाचा महान शत्रू आहे. आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवावे. तरुणाध्ये, विद्यार्थ्यांमध्ये गुणसंपदा असायला हवी. जे कराल ते ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठता, सदाअध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वाकांक्षा इति विद्यार्थीगुण पंचक्रमा। थॉमसन हक्सले म्हणतात, “मला एक असा तरुण मिळून द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे.
त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे आहे. पारदर्शक व स्वच्छ आहे; तर मी जगात कोणताही चमत्कार करून दाखविल.”खर आहे आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते.
मान्यता पावलेले आदर्श व्यक्तिमत्त्व नेहमीच आपल्याला उपयुक्त ठरेल. भारतीय युवकांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे व अगदीच अलीकडच्या काळातील म्हंटले तर डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांचा उल्लेख होईल.
यांनाच आदर्श का म्हणावे या मागील काही महत्वाची कारणे विशद करणे मला महत्वाचे वाटते. त्यांचे नुसते ज्ञान प्रचंड आहे. एवढेच नाही तर त्यांची नैतिकता व सखोल विचार करण्याची प्रवृत्ती होती. गौतम बुद्धांनी उपदेश केलेला मी  सांगतो आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेऊ नका. धर्मग्रंथात आहे म्हणून आंधळेपणाने स्वीकार करू नका, तर सर्व विचार तुमच्या बुद्धीवर तपासून पहा आणि योग्य- अयोग्य काय ते ठरवा.या उपदेशांचे तंतोतंत त्यांनी पालन केले.
साधे जीवन जगत उच्च विचारसारणी जोपासली. त्यांची काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही तरी करून दाखवण्याची मनीषा व आपण जगाला काही तरी देणे लागतो ही भावना हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंकडे काही आहेत.
जेव्हा या तरुणांना ध्येयाने पछाडले जाईल, संकटांना सामोरे जाण्यासाठी निधडी छाती निर्माण होईल, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल त्यावेळेस उज्ज्वल भारतवर्षाची निर्मिती होऊ शकेल. ही जबाबदारी पेलणे हे जबरदस्त आव्हाने नियतीने तरुणांसमोर ठेवले आहे.
या आव्हानांना सामोरे जातांना दुसरे पुढे असणारे आव्हान म्हणजे समाजकारण व राजकारणात युवाशक्तीचा सहवास ढोबळमनाने युवा समाजाचा विकास हा उद्याच्या समाजाचा विकास आहे. फायद्याच्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणे व समाजाच्या फायद्यासाठी काम करणे हेच हितवह ठरेल. पाश्र्चात्य युवक चळवळीपासून एकांगी व असमज धडा घेणारे मूठभर विद्यार्थी मॉड तरुण, तथाकथित संतप्त तरुण साहित्यिक व राजकीय पक्षांच्या अधीन असलेल्या गटांच्या मोहजालातुन सुटणे व या घटकांना सरळ करणे कालप्राप्त ठरेल.
मृणाल पाटील, बी.वाय. के. कॉलेज
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!