गारवा बियरबारमध्ये चोरी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-औरंगाबाद रोडवर हॉटेल गारवा येथे चोरट्यांनी बियर बारचे शटर तोडून आत प्रवेश केला.

हॉटेलमधील साहित्यांची उचकापाचक करून काही वस्तुंची नासधुस केली. व गल्ल्यातील 10 हजार रुपये चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.30) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

हा प्रकार हॉटेल मालक महेश पाराजी निमसे (रा. शेंडी) यांना समजला असता त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गाजरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*