Thursday, May 2, 2024
Homeनगर‘बजरंग’च्या पिंडदानाने तरळले कोळपेवाडी ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू

‘बजरंग’च्या पिंडदानाने तरळले कोळपेवाडी ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोळपेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन कोळपे यांच्या कुटुंबातील जिवापाड जपलेल्या काठियावाड पंचकल्याण बंजरंग घोड्याच्या पिंडदानाने कोळपवाडी ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळून आले.

- Advertisement -

नाशिक येथून अर्जुन कोळपे यांनी काठियावाड मारवाडी जातीचा पंचकल्याण घोडा 90 हजारांना खरेदी करत सवारीसाठी तयार केले. मुलांच्या प्रेमापोटी बजरंगला गोठ्यात आणत सवारीचे सर्व गुण शिकवून शर्यतीसाठी तयार करून गाव व मालकाचे नाव मोठे करण्याचा चंग बांधला होता. बजरंग नावाला शोभेल अशी शरीरयष्टी, सफेद बांडा रंग, घारे डोळे, 4 फूट उंचीचा घोडा रस्त्याने धावू लागल्यावर अनेकांना घोड्याचा मोह तर कोळपे कुटुंबातील सदस्यांचा उर अभिमानाने भरून यायचा.

15 दिवसांपूर्वी पायाला जखमेचे कारण होऊन बजरंग आजारी पडला. व्हेटर्नरी डॉक्टर, आयुर्वेदीक औषधाद्वारे उपचार केले. मात्र उपचाराला बजरंगची साथ न मिळाल्याने त्याने अखेरचा श्वास घेतल्याने कोळपे कुटुंबियाबरोबर ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. पाचव्या दिवशी बजरंगच्या दशक्रियेवेळी रूपेश कोळपे, किरण गेठे, शाम कोळपे, पप्पू शिंदे, अमोल जाधव यांनी सुतक पाळत पुरोहित प्रकाश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पितृपक्षात पिंडदान केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या