उल्लेखनीय काम करणार्‍या अपंगांचा आज होणार सन्मान

0

साहेबराव अनाप : जिल्हा परिषदेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी) – जागतिक अपंग दिनानिमित्त जनजागृती सप्ताह अंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या गुणवंत अपंग कर्मचार्‍यांना आज मंगळवार (दि.5) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे राहणार आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात राजेंद्र आव्हाड संगमनेर, मंदा भारमल-अकोले, प्रशांत दर्शने-श्रीरामपूर, दत्तात्रय फुंदे-शेवगाव, खंडू बाचकर-राहुरी, योगेश भागवत-कोपरगाव, यशवंत माळी-राहुरी, अनिल घोलप-राहाता, योगेश सूर्यवंशी-नगर या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाचा विद्यार्थी अभिजित माने याने अपंग जलतरण स्पर्धेत विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात येणार आहे. दत्तात्रय जपे, संतोष सखदे, उध्दव थोरात, एकनाथ वाडगे यांना अपंग रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*