पहाटेपर्यंत हनीप्रितची चौकशी; पोलिसांनी विचारले हे ९ प्रश्न

0

नवी दिल्ली, ता. ४ : जेलमध्ये असलेल्या गुरमित राम राहीमच्या सर्वात जवळ समजल्या जाणाऱ्या हनीप्रितला पोलिसांनी मंगळवारी दुपारी पटियाळा – जिरकपुर महामार्गावरून ताब्यात घेतले.

गेल्या दोन तीन दिवसांपासून तिने वृत्त वाहिन्यांना मुलाखती दिल्याने पोलिसांनी सतर्कता वाढविली आणि तिचा कसून तपास केल्यानंतर काल तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबत सुखदीप नावाच्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस आज तिला पंचकुला न्यायालयात हजर करणार असून तिचा रिमांड घेण्यासाठी सबळ कारणे आणि माहिती गोळा करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर पंचकुला येथील दंगलीत कुणाचा हात होता, घटनेनंतर ३९ दिवस ती कुठे होती? यासंदर्भात साडेचार तास चौकशी करत होते. पहाटे तीन पर्यंत ही चौकशी चालली.

तिला पंचकुलाच्या चंडीमंदिर पोलिस स्थानकात ठेवण्यात आले होते. यावेळी आयजी ममता सिंह आणि  आयजी एएस चावला यांनी स्वत: प्रश्नांची यादी तयार करून विचारपूस केल्याचे समजते. हे सर्व एका कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.

दरम्यान हनीप्रितला जास्तीत जास्त ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.

पंचकुला पोलिसांनी हे प्रश्न हनीप्रितला विचारले आहेत.
  • पंचकुलात दंगल घडविण्यासाठी किती रुपये देण्यात आले होते?
  • या घटनेमागे कुणाचा हात होता?
  • गुरमीतसिंगचा या दंग्यात काही हात होता काय?
  • डेऱ्यातील ४५ सदस्यांच्या समितीचा या प्रकरणात काही भूमिका होती का?
  • हनीप्रितला पोलिस छाप्याची माहिती मिळत होती का?
  • असेल, तर कुणाच्या माध्यमातून?
  • आणि नसेल, तर बाढमेर, श्रीगंगानगर, गुरसर मोडिया, उदयपूर, उत्तरप्रदेश, दिल्ली, गुरुग्राम येथून पोलिस येण्यापूर्वीच हनीप्रित कशी निघून जात असे?
  • रोहतकच्या सोनारिया कारागृहातून निघाल्यानंतर हनीप्रित पोलिसांसमोर का नाही आली?
  • पवन आणि आदित्य इंन्सान यांच्यासोबत शेवटचा संपर्क कधी झाला? सध्या ते दोघे कुठे आहेत.

LEAVE A REPLY

*