Type to search

ब्लॉग सार्वमत

Blog: घरमालकांनो सावधान !

Share

अहमदनगर जिल्ह्यात सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळाच्या नजीक असणार्‍या निमगावमध्ये तिघांची हत्या करण्याची घटना घडली. हत्येमागचे कारण कचरा टाकणे व लघुशंका करणे हे होय. खरं तर शिर्डीत अनेक लोक बाहेरून आल्याने घर भाड्याने घेणार्‍यांची संख्या अधिकच आहे. शिर्डीत गुन्हेगार पार्श्‍वभूमीचे लोक येऊन आपल्या नातेवाईकांकडे राहतात. साहजिक साईबाबांच्या दर्शनाच्या निमित्ताने आलेले पाहुण्यांचे स्वागत केले जाते. पण आता घर भाड्याने देणे अधिक धोक्याचे झाले आहे. घरमालक हा भाडे वाढवून मिळण्याच्या प्रयत्नात असतात. मग त्याची पार्श्‍वभूमी काय याची चौकशी बहुतेकजण करत नाही. भाड्याने राहत असलेल्या गुन्हेगारांचा कट कसा शिजतो याची अनेक ज्वलंत उदाहरणे प्रामुख्याने समोर येत आहे.

घर भाड्याने कुणाला द्यावे हा देखील प्रश्‍न अडचणीचा बनला आहे. काही लोक चांगले असले तरी त्यांच्या नातेसंबंधातील लोक अशा घरात काही काळ का होईना आश्रय घेत असतात. त्यांचा संबंध हा गुन्ह्याशी जोडला जात असतो. आश्रयाच्या ठिकाणावरूनच आपले गुन्हेगारी कृत्य करण्याचे नियोजन आखत असतो. यापूर्वीही शिर्डीत अशाच एका गुन्हेगाराने आश्रय घेऊन एका लहान मुलीवर अत्याचार करत तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या परिसरात टाकून दिला. या घटनेतील आरोपी पकडला. तो यापूर्वी अनेक बलात्काराच्या आरोपातून गुन्ह्याची शिक्षा घेऊन बाहेर आलेला होता. त्यामुळे आता आपण घर भाड्याने कुणाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आली आहे. घर भाड्याने देताना फार गांभीर्याने बघितले जात नसले तरी कधी पण आपल्याला अशा प्रसंगाना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते याचा विचार केला पाहिजे.

केवळ गुन्हेगारच नव्हे तर काहींची मनोवृत्तीही प्रामुख्याने तपासली पाहिजे. काही व्यक्तींना मनोविकाराचा आजार जडलेला असतो. कधी नव्हे पण त्यांना तो गुन्हेगारीला प्रवृत्त करत असतो. म्हणून घर भाड्याने दिले तरी त्यांच्या कृती व हालचालीवर नजर ठेवण्याचे काम झाले पाहिजे. तशी बाब घरमालकाच्या लक्षात आली तरी त्यांनी तातडीने योग्य असा निर्णय घेतला पाहिजे.

– संतोष लाड

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!