Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

होमक्वॉरंटाईन करण्यात आलेले तब्लीग जमातचे 10 प्रचारक पळाले

Share

पुणे (प्रतिनिधी) – तब्लीग जमातच्या प्रसारासाठी दिल्लीवरून पुणे जिल्ह्याच्या शिरूर येथे आलेले 10 जण पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्वाचं म्हणजे या सर्वांना होमक्वॉरंटाईनचे शिक्के मारलेले असताना हे नागरिक पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, महिनाभरापुर्वी हे 10जण दिल्ली येथून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आले होते. परंतू देश लॉकडाऊन झाला आणि हे सर्व नागरिक शिरूर शहरात अडकले. परंतू रात्री हे नागरिक होमक्वॉरंटाईन असताना हि शिरूर वरून दिल्लीला एका मालवाहतूक ट्रक मध्ये बसून गेले आहेत अशी माहिती आहे.

धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे तब्लीगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्लीत गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागन झाल्याने देशात एकच खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे त्याच कार्यक्रमाच्या प्रसारासाठी शिरूरमध्ये आलेले 10 जण पळून गेलेच कसे हा मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

या सर्वांवरती आता शिरूर पोलिस स्टेशन मध्ये कलम 188, 269,271 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 51ब, मोटर वाहन कायदा कलम 66(1),192 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!