सहकारी बँकांमधूनही मिळणार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृहकर्ज

पंतप्रधान आवास योजनेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

0
नाशिक | दि.१८ प्रतिनिधी – पंतप्रधान आवास योजनेतील सबसिडीचा लाभ घेताना पूर्वी राष्ट्रीयीकृत बॅकांचाच विचार केला जात होता. परंतु आता सहकारी बँका अथवा वित्तीय संस्थांमधूनही या योजनेंतर्गत गृहकर्ज घेतल्यास सबसिडीचा लाभ घेता येईल असा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान आवास योजनेच्या बैठकीत घेण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयात या बैठकीचे आयोजनन करण्यात आले होते त्यात दिल्ली येथून अधिकारी, महााराष्ट्र शासनाचे गृहनिमा्रण प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, अप्पर आयुक्त कुलकर्णी, म्हाडाचे प्रादेशिक अधिकारी ररमेश मिसाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत नाशिक महापालिका क्षेत्रातील घरकुलांच्या विषयावर विचार करण्यात आला. महापालिकेने यादी तयार करून ती यादी बँकांकडे पाठवावी अशा सूचना करण्यात आल्या. याशिवाय महापालिकेने बँकाकडे पाठपुरावा करावा. तसेच त्या त्या भगातील राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

त्यामुळे लाभार्थीने तेथून गृहकर्ज घेतल्यास त्याला सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ हजारो लाभार्थ्यांना होणार आहे. नाशिक महापालिका हददीत डिमांड सव्हे म्हणजेच पोर्टलव्दारे तसेच शासनाकडे थेट ५० हजार ९६३ जणांनी अर्ज केलेले आहेत तर झोपडपटटी सर्व्हेक्षणाात ४५ हजार २४८ अर्ज प्राप्त झालेले आहेत.

तयात सबसिडी योजनेंतर्गत १० हजार १५७ अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी ९ हजार ३२८ अर्ज पात्र झालेले आहेत. तसेच डिमांड सर्व्हत सर्वांना परवडणारी घरे या योजनेत ३८ हजार ७५७ अर्ज आले होते त्यापैकी ३४ हजार ५४० अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच वैयक्तिक लाभार्थी गटात २ हजार ४९ अर्ज आले होते त्यापैकी ६११ अर्ज पात्र ठरले आहेत.

दरम्यान झोपडपटटी योजनेत पात्र ठरलेले लाभार्थ्यांची अंतिम यादी अद्याप झालेली नाही. या सर्व लाभार्थ्याचे कागदपत्रे तपासणी, पुरावे आदींसाठी महापालिकेकडून महिनाभरात कॅम्प लावण्यात येणार आहे. त्यानंतर खरे लाभार्थी व त्यांची यदी तयार केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी दिली.

बँकांकडे १० हजार अर्ज
महापालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी झोपडपटटी सर्व्हेक्षणातील १० हजार अर्ज शहातील विविध बँकांकडे पाठविण्यात आलेले आहेत. त्यावर लक्ष ठेवण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. पात्र अर्जदारांनी सर्व पुर्तता पुर्ण केल्यास त्यांना सबसिडीचा लाभ देण्यात येणार आहे.

खासगी भुखंडावरही योजना
केवळ झोपडपटटी अन खाजगी वैयक्तिक जागांवर ही योजना राबविण्यात येत होती परंतु आता नवीन नियमानुसर खासगी जागेतही ही योजना राबविता येणार आहे. त्यामुळे विकसकांनी प्रस्ताव दिल्यास तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेने खासगी भूखंडाबाबत के्रडाईकडे आधीच प्रस्ताव पाठविला आहे. परंतु क्रेडाईकडून कोणताही प्रतिसाद या योजनेबाबत मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

*