Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

होमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे!

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आता होमगार्ड जवानांचा बंदोबस्त मागविण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करत आहे. त्यासाठी राज्य शासनाने होमगार्डच्या सर्व तालुका आणि जिल्हा कार्यालयांकडून त्याबाबतचा अहवाल मागविला असून यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहरी भागांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहे. ही अनधिकृत बांंधकामे रोखण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयत्न करण्यात आले.

त्यामध्ये काही प्रमाणात यश आले असले तरी ही अनधिकृत बांधकामे पूर्णपणे थांबलेली नाहीत, त्यामुळे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची डोकेदुखी अधिकच वाढली असून त्यामुळे यावर उपाय म्हणून होमगार्ड जवानांचा बंदोबस्त घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्यात होमगार्ड जवानांची संख्या सध्या 40 हजारांंच्या आसपास आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर होमगार्ड दलाची कार्यालये आहेत, त्याशिवाय होमगार्डचे जवान मानधनावर नियुक्त असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना हे जवान तत्काळ उपलब्ध होणार आहेत. ज्यावेळी बंदोबस्त असतो, त्याचवेळी या जवानांची मदत घेतली जाते आणि त्यांना त्याच दिवसांचे मानधन मिळत असते.

त्यामुळे या जवानांना या बंदोबस्तावर नेमल्यास त्यांनाही त्याचा आर्थिक लाभ होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, राज्य शासन यावर काय निर्णय घेते, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!