होमगार्ड यांना उपजिविकेचे साधन म्हणून मानधन मिळावे

0

महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाच्या राज्य संघटनेचे हजारेंना साकडे

टाकळीभान (वार्ताहर)- महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलातील (होमगार्ड) सदस्यांना राष्ट्राची निष्काम सेवा केल्याने निवृत्तीनंतर हालाखीचे जीवन जगत असल्याने व निराधार झाल्याने उपजिवीकेचे साधन म्हणून मानधन मिळावे, अशा मागणीचे निवेदन थोर समाजसेवक अण्णा हजारे यांना राज्य संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
यावेळी प्रभारी अध्यक्ष बबनराव वरघुडे, उपाध्यक्ष पुंजाराम खंडेराव पटारे, हरिभाऊ पवार, इसाक म्हैताब पठाण व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन यावेळी हजारे यांनी शिष्टमंडळाला दिले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, आम्ही सर्व गृहरक्षक दालाच्या सदस्यांनी ऐन उमेदीच्या काळात राज्यातील जनतेची निष्काम सेवा केली आहे. आम्ही सर्व गरीब कुटुंबातील आहोत. दंगे-धोपे, राष्ट्रीय सण, संकट काळात, देवदेवतांचा यात्रोत्सव, आपत्तीत पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे 15 ते 20 वर्षे काम केले आहे.
आज वयाची पन्नाशी ते साठी आम्ही ओलांडलेली आहे.त्यामुळे कामधंदा होत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.जगण्याचा कोणताही आधार राहिलेला नाही.उमेदीचे वय राष्ट्रसेवेला आम्ही समर्पित केले आहे. मात्र निष्काम राष्ट्रसेवा करुनही आमची अवस्था केविलवाणी झाली आसल्याने माजी गृहरक्षक दलाच्या सदस्यांना व दिवंगत सदस्यांच्या पत्नींना दरमहा रु.7 हजार मानधन,कुटुंबाला मागणीप्रमाणे घरकुल, सर्व कुटुंबाला मोफत वैद्यकीय सेवा, व पाल्यांना सेवेत सामावून घ्यावे व राष्ट्रसेवेचा आमचा वारसा जतन करावा आदी मागण्यांचे निवेदन समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आले आहे.
हजारे यांनी निवेदन स्वीकारून आपली मागणी योग्य असल्याने या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मी आपल्या सोबत असून यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन हजारे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. या निवेदनावर राज्य कार्यकारिणीचे बबनराव वरघुडे, पुंजाराम पटारे, इसाक पठाण, रंगनाथ शिरसाठ, ज्ञानदेव शिरसाठ, अशोक घोगरे, भाऊसाहेब बर्डे, बाबू शेख, सुल्तान शेख, अप्पा डिके, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब शेळके, गोरख शिंदे, बारकू शिरसाठ, जब्बार शेख आदींसह असंख्य सदस्यांच्या सह्या आहेत. या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, खासदार, आमदार व संबंधित विभागाच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*