Type to search

नाशिक

वाजगाव येथे शॉकसर्किटने घर जळाले

Share

मटाने | वार्ताहर

देवळा तालुक्यातील वाजगाव येथील शेतकरी गोविंद देवरे यांच्या शेतातील (गट नं.३१८) घरात आज (दि.१५) दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास शॉकसर्किट होऊन घरातील फ्रिज, कपाट, किचनमधील सर्व साहित्य जाळून खाक झाले.

मिळालेली माहिती अशी की, वाजगाव येथील प्रगतशिल शेतकरी गोविंद देवरे हे भायदे शिवारातील शेतात वास्तव्यास होते. त्यांचे चुलत बंधू विश्वास देवरे नुकतेच मयत झाल्याने गोविद देवरे व त्याच्या संपूर्ण परिवार मयतांच्या घरी गावात गेले होते. आज (दि.१५) दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे विजेचा लपंडाव सुरु केला आणि घरात शॉकसर्किट झाले.

शॉकसर्किटमुळे घरातील फ्रीजचा स्पोट झाला. हळूहळू आग संपूर्ण घरात पसरली व घरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तूंनी पेट घेतला.

घराचे दरवाजे व खिडक्या बंद असल्याने घरातील आग व धूर बाहेर दिसत नसे पण गोविंद देवरे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेले सुजित देवरे, बिपीन देवरे, राकेश देवरे यांनी घरातून खूपच काळाधूर निघत आहे. आणि या घरातील सर्व सदस्य गावात गेले मग नेमके झाले तरी काय? उपस्थितांनी क्षणाचा विलंब न लावता शेजारील शेतकऱ्यांना बोलावले आणि कुलूप तोडून घराचे दरवाजे खिडक्या उघडल्या आणि घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली.

फ्रिजच्या शेजारील लोखंडी कपाट गरम होऊन कपाटातील कपडे, साड्या आणि २० ते २५ हजार रुपये जळाले. यासह किचन रूममधील संपूर्ण साहित्य, कपडे, आदि सर्व संसार जळून खाक झाला. अद्याप नुकसानीचा अंदाज समजू कशला नाही.

याबात घटनेची माहिती मिळताच गावतील पोलीस पाटील निशा देवरे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक देवरे, प्रगतशिल शेतकरी श्रीराम आण्णा देवरे, तंटामुक्त अध्यक्ष निवृत्ती देवरे, देवराम देवरे, बळीराम देवरे, बाळसाहेब देवरे, प्रदिप देवरे, शांताराम देवरे, विश्वास महाले, दिपकराजे देवरे, चेतन देवरे, टिपू देवरे, गुड्डू देवरे, भैय्यू देवरे आदींनी परिश्रम घेत घरातील साहित्य बाहेर काढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!