Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

संततधार पावसाने घरांची पडझड, भात शेतीचे नुकसान

Share

सुरगाणा | प्रतिनिधी

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने भात शेतीचे नुकसान झाले असून घरांची पडझड झाली आहे. तहसिलदार दादासाहेब गिते यांनी तालुक्यातील बुबळी, साबरदरा, रोकडपाडा, सालभोये, पांगारबारी, चिकाडी, औरंबे, दुमी, मनखेड, हेमाडपाडा, जांभूळपाडा (दा),पळसन, ऊंबदे(प) येथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट घेऊन भात पिंकांची व पडझड झालेल्या घरांची पाहणी करून तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.

यामध्ये पांगारबारी येथील यशवंत बुधा कडाळी यांचे घरकुलांची मागील बाजुची भिंत कोसळली असून सिमेंटचे पत्रे फुटून पन्नास ते साठ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

नरेंद्र देवराम चव्हाण यांचे रहात्या घराचे सिमेंट पत्र्याचे छप्पर कोसळून घरातील सामान व धान्य भिजले आहे. करवंदे येथील पंडीत भोये यांचे कोलारु छप्पर पडले असून भिंती ढासळल्या आहेत.

रतन चौधरी ऊंबरदे (प) यांचे इंदिरा आवास घरकुल मोडून पडले आहे. वांझुळपाडा येथील तानजी जोपळे, यशवंत काळू पवार यांचे राहते घर कोसळले असून यामध्ये जीवितहानी मात्र झालेली नाही. या सर्व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार दादासाहेब गिते यांनी दिले आहेत.

यावेळी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पाहणी दौ-यात सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ जाधव, शिक्षक रतन चौधरी, तलाठी गोंविद काळे,राजेंद्र सुलाणे, सोमनाथ कोकणी, पोपट भोये आदिंचा समावेश होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!