#Playboy : ‘प्लेबॉय’ची यशोगाथा आता रुपेरी पडद्यावर! ऑस्कर विजेता जेरेड लेटो दिसणार मुख्य भूमिकेत

0

‘प्लेबॉय’ मासिकाचे संस्थापक ह्य़ु हेफनर यांचे नुकतेच वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.

ह्य़ु हेफनर यांची यशोगाथा सांगणारा चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक ब्रेट रेटनर यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून ऑस्कर पुरस्कार विजेता जेरेड लेटो हा हेफनर यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेट यांना हेफनर यांचा संपूर्ण प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याची इच्छा आहे.

याआधी 2008 साली रेटनर यांनी हेफनर यांच्या आयुष्यावर चरित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती; पण त्या वेळी काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ते शक्य झाले नव्हते. यावेळी तरी ते सध्या होते कि नाही ते वेळच ठरवेल.

LEAVE A REPLY

*