अँजेलिना जोलीला वर्षभराच्या आत हवा घटस्फोट

0
मुंबई : हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीला ब्रॅड पीटपासून या वर्षाच्या अखेरपर्यंत घटस्फोट हवा आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघे विभक्‍त झाले आहेत. पण त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अँजेलिनाने 2016 मध्ये ब्रॅड पीटपासून घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. जवळपास 10 वर्षांच्या रोमान्स आणि केवळ 2 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याची सांगता होणार हे आता निश्‍चित झाले आहे.

लॉस एंजेलिसमधील सुपिरीयर कोर्टात तिने अर्ज करून या वर्ष अखेरीपर्यंत निकाल देण्याची विनंती केली आहे. वेगळे रहायला लागल्यापासून ब्रॅड पीटने मुलांच्या संगोपनासाठी व्यवस्थित पैसे दिलेले नाहीत, असा दावाही तिने केला आहे. केवळ काही जुजबी रक्कम त्याने उपलब्ध करून दिली. मात्र ही हे पैसे नियमितपणे देण्याची व्यवस्थाही त्याने केली नाही, असेही अँजेलिनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*