Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशHoli 2023 : भारतातील विविध भागांमध्ये कसा साजरा केला जातो होळीचा सण?

Holi 2023 : भारतातील विविध भागांमध्ये कसा साजरा केला जातो होळीचा सण?

भारतात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. होळीच्या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात. हा सण देशातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा आहे. काही राज्यांमध्ये याला छोटी होळी असे म्हटले जाते. प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने त्याच्या बहिणीची मदत घेतली. पण या प्रयत्नांमध्ये होलिकेचा अंत झाला. होलिका दहनासाठी लाकूड, गवत आणि शेणाची पोळी यांची एक मोठी मोळी उभी केली जाते, त्याभोवती सजावट करुन तिची पूजा केली जाते. त्यानंतर तिला अग्नी दिला जातो. सोबतच होलिका दहनासाठी तयार केलेले पदार्थ अग्नीत समर्पित केले जातात.

- Advertisement -

महानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा

होळी आणि रंगपंचमीचा सण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मथूरा, वृंदावन, गोकूळ या ठिकाणची होळी पाहण्यासाठी देशभरातीलच काय तर परदेशातूनही लोकं खास उत्तर प्रदेशमध्ये येतात. मथुरा जवळील बरसाना या गावातील लठमार होळी विशेष प्रसिद्ध आहे. होळीच्या दिवशी इथले स्त्री-पुरुष एकमेकांना काठीने मारतात. उत्तरप्रदेशमधील ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अनोखी प्रथा आहे.

Vada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत ‘वडापाव’चा समावेश

वाराणसीमध्ये भस्म होळी खेळण्याची मोठी प्रथा आहे. नागा साधू, अघोरी आणि अन्य साधू मंडळी ही अनोखी होळी खेळतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमा झालेल्या राखेने होळी खेळण्याची अघोरी संप्रदायमध्ये परंपरा आहे. ही होळी प्रामुख्याने स्मशानभूमीमध्ये साजरी केली जाते. पश्चिम बंगाल, ओडिसा अशा काही राज्यांमध्ये होळीच्या दिवशी दोल जत्रा/ डोल जात्रा असते. या निमित्ताने कृष्णाची आराधना केली जाते. कृष्ण-राधा यांच्या मूर्ती झोपाळ्यावर प्रस्थापित केल्या जातात. पूजा सुरु असताना झोपाळा झुलवला जातो. त्यानंतर भक्तगण मिळून रंग खेळतात.

भयंकर! अल्पवयीन मुलीने Youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन् नवजात बाळाला…

देवांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये होळी सणाला विशेष महत्त्व आहे. होळीच्या दिवशी इथली लोकं पारंपारिक वस्त्र परिधान करतात. तसंच पारंपारिक गाण्यावर ताल धरत होळी साजरी करतात. याला बैठीका होळी, खडी होळी असंही म्हटलं जातं. मणिपूर राज्यात होळी आणि योशांग हे उत्सव एकत्रितपणे साजरा केले जातात. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामूहिक गायन-नृत्य करत नागरिक हा सण साजरा करतात.

“उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे…”; रामदास कदमांचा घणाघात

शीख धर्मियांचं पवित्र धर्मस्थान श्री आनंदपूर साहिब इथं होळीच्या दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या यात्रेला होला महल्ला असं म्हटलं जातं. शीख धर्मींयांमध्ये होला मोहल्लाचं खास महत्त्व आहे. इथ होळी पौरुषी प्रतीक म्हणून साजरी केली जाते. यासाठी गुरु गोविंद सिंह यांनी होळी याचा पुल्लिंग शब्द होल असा प्रयोग सुरु केला. होला मोहल्ला सहा दिवस साजरा केला जातो. या दरम्यान घोड्यावर स्वार होत हातात तलवार घेत साहसी खेळ दाखवले जातात. तसंच किर्तन आणि रंगांची बरसात केली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या