Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारकार्यकर्त्यांना अटक केल्याने होळीचे कार्यक्रम रद्द – पाटकर

कार्यकर्त्यांना अटक केल्याने होळीचे कार्यक्रम रद्द – पाटकर

नंदुरबार  –

नर्मदा नियंत्रण प्राधीकरणाचे संचालक अफरोज अहमद यांच्या दौर्‍याप्रसंगी मोर्चा काढून निषेध करणार्‍या नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याने पोलीस विभागाचा निषेध करत पुनर्वसनातील सर्व होळीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या श्रीमती मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

- Advertisement -

श्रीमती पाटकर म्हणाल्या, दि. 6 मार्च रोजी नंदुरबार येथे नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ.अफरोज अहमद हे आले होते. नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अफरोज अहमद गो-बॅक अशा घोषणाबाजी केल्या. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांकडून सुमारे 59 जणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

अफरोज अहमद हे सन 2008-09 पासून काम पाहत आहेत. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात खोटी शपथपत्रे सादर केली आहेत. राज्याकडून देण्यात आलेल्या कोणत्याही अहवालाची त्यांनी तपासणी न करता तसाच अहवाल न्यायालयात पाठविला. खरे तर ते सेवानिवृत्त होऊनही त्यांची महाराष्ट्र शासनाकडून सल्लागार म्हणून नेमणूक झाली कशी?

अफरोज अहमद यांच्याबाबत त्यांच्याच सहकार्‍यांनी फिर्याद दिली असून त्यांची पदवी बनावट असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला.

त्यांच्याबाबत गो-बॅक अशी घोषणाबाजी नर्मदा बचावचे कार्यकर्ते देत असतांना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच दाखल करण्यात आलेली फिर्यादही दिशाभूल करणारी आहे.

पोलिसांच्या कामात कोणताही अडथळा आणलेला नसतांना किंवा धक्काबुक्की केलेली नसतांना पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप पाटकर यांनी केला असून जामिनावर त्यांची सुटका होऊन मग चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या