खासगी क्लासेस चालकांविरोधात धरणे

0
नाशिकरोड | दि. १ प्रतिनिधी- अनुदानीत शाळा आणि महाविद्यालयात नोकरी करत असूनही खासगी क्लासेस घेणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल टीचर्स असोसिशएनतर्फे नाशिकरोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.

उपसंचालक रामचंद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले. अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन जाधव यांनी शिष्टमंडळाला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनाचा आशय असा अनुदानित शाळा व महाविद्यालयातील काही शिक्षक बंदी असतानाही खासगी क्लास घेतात.

विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षेचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवतात. विद्यार्थी क्लासमध्ये यावेत म्हणून विविध क्लृप्त्या करुन विद्यार्थ्यांची लूट करतात.

खासगी क्लास व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांचे यामुळे नुकसान होत आहे. नोकरी नाही व क्लासही चालत नाही अशी आमची अवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी.

आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, लोकेश पारख, ज्ञानेश्वर म्हस्के, कैलास देसले, फैजल पटेल, अतुल वाचळे, यशवंत बोरसे, शिवाजी कांडेकर, किशोर सपकाळे, निलेश दुसे, अरुण कुशारे, प्रदीप पाटील, आशिष कोयंडे, मनीष घोटेकर, योगेश क्षत्रीय, सचिन जाधव, उदय शिरोडे, मच्छिंद्र म्हस्के, युवराज पाटील, धनंजय शिंदे, चेतन पाटील, अविनाश सोनवणे आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*