हिवरे बाजारचा डबल धमाका मिळाला 35 लाखांचा पुरस्कार

0

औरंगाबाद- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार गावाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. दोन्ही पुरस्कारांवर हिवरे बाजार गावाने नाव कोरले आहे. नाशिक विभागात नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार प्रथम आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही महिती दिली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये हिवरे बाजारने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ अभियानात विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत 25 लाख तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये 10 लाखांचे बक्षीस हिवरे बाजार गावाने पटकावले आहे. असा एकूण 35 लाख रुपयांचा पुरस्कार हिवरे बाजार गावाला मिळाला आहे. नाशिक विभागात हिवरेबाजारला दहा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अवनखेड (ता.दिंडोरी, जि.नाशिक) गावाला आठ लाखांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा चार महिन्यांत डीपीआर निघणार व सात ते आठ महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.

1992मध्ये ग्राम अभियानात विभागात प्रथम येऊन सुरुवात झाली होती. त्यानंतर 2000 मध्ये संत गाडगेबाबा अभियानातही हिवरे बाजार जिल्ह्यामध्ये प्रथम आले होते. त्यावेळेस गावाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरही गाव स्वच्छ ठेवण्याबाबत गावकर्‍यांनी सातत्य ठेवले होते. ग्रामस्थांची पराकाष्टा आणि जिद्दीच्या जोरावरच आताही पुरस्कार मिळाले आहेत.
– पोपटराव पवार, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष

LEAVE A REPLY

*