Video : क्रिकेटवरुन मारहाणीची अफवा; जूने नाशिक मध्ये तणाव

0

नाशिक | आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरात कडबा कुट्टी मालक आणि नोकरांमध्ये पैसे देण्या घेण्यावरून वाद निर्माण झाला होता.

वादाचे पर्यवसान हाणामारीत व लूटीत झाले. वाद प्रचंड चिघळला होता. त्याच वेळी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना संपला. भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यामुळेच वाद झाल्याची अफवा पसरवली गेल्यामुळे येथे तणाव नित्यानंद झाला होता.

नेहमीच अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमध्ये सोशल मीडियातून भारत सामना पराभूत झाल्यामुळे  वाद झाल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. मारहाणीचे कारण दुसरेच होते. या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.

त्याचवेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील , सहा. आयुक्त राजू भुजबळ,यांनी याठिकाणी तत्काळ भेट दिली त्यानंतर वादाचे कारण शोधून काढत यांनी एका व्हिडीओ क्लिपद्वारे अफवा न पसरवण्याचे आवाहन केले.

 

LEAVE A REPLY

*