सायकलिस्ट महाजन बंधूंपैकी हितेंद्र यांनी पूर्ण केली लेह मॅरेथॉन

0
छायाचित्र महाजन बंधूंच्या फेसबुक पेजवरून साभार

नाशिक, ता. ७ : नाशिककर सायकलपटू हितेंद्र महाजन यांनी लेह येथील ७२ किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे अठरा हजार फुटांवर असलेले आणि बर्फाचे साम्राज्य असलेले खरदुंगला सर करून त्यांनी ही मॅरेथॉन केवळ १० तास ३४ मिनिटांत पार केली.

सायकलपटू म्हणून नाशिकचे महाजन बंधू प्रसिद्ध असून त्यांनी आजपर्यंत सायकलस्वारीचे अनेक राष्ट्रीय आणि जागतिक विक्रम केले आहेत.‍

अमेरिकेतील खडतर आणि वळणावळणांची समजली जाणारी स्टेट ॲक्रॉस अमेरिका अर्थातच रॅम ही मॅरेथॉन या बंधूंनी यशस्वीपणे सर केली आहे.

 

LEAVE A REPLY

*