माझ्या नवऱ्याची बायको मधील सौमित्र करणार कॉमेडी

0

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

लवकरच चला हवा येऊ दे च्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत. आता थुकरटवाडीत येऊन कॉमेडी करून सौमित्र म्हणजेच अद्वैत प्रेक्षकांचे किती मनोरंजन करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

प्रेक्षकांना या पर्वात अद्वैतला पाहता येईल. त्याच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांनी मागच्या भागात पाहिली. त्याचा कॉमेडी करण्याबद्दलचा अनुभव शेअर करताना सौमित्र म्हणाला, “एक स्किट परफॉर्म करण्यासाठी आम्ही खूप रिहर्सल केली. आता चला हवा येऊ द्या च्या मंचावर कॉमेडी करायची आहे त्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी मंचावर सज्ज होऊ. या सीझनसाठी मी खूप उत्सुक आहे.”

LEAVE A REPLY

*