Type to search

Featured हिट-चाट

विकी कौशल ठरला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता

Share
विकी कौशल ठरला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता, Hit chat Vickey Caushaal Popular Actor Mumbai

मुंबई- नुकत्याच रिलीज झालेल्या ‘भूत’ या आपल्या भयपटानंतर बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता ठरला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत बाकी बॉलीवूड अभिनेत्यांना मागं टाकत विकी कौशल लोकप्रियतेत अव्वल ठरला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीन लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

या आकडेवारीनूसार, व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकी कौशलने 100 गुणांसह लोकप्रियतेत प्रथम स्थान पटकावलं आहे. विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट भूतच्यामूळं आणि कैटरीना कैफसोबत असलेल्या त्याच्या मैत्रीमुळं व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे. आणि यामुळंच तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर 46 गुणांसह दूस-या स्थानी आहे.

शाहिदचा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, त्यानंतर त्यानं चित्रीकरण पून्हा सुरू करणं, आणि त्यानंतर त्याची पत्नी मीरासोबत शाहिदनं साजरा केलेला वाढदिवस ह्या सगळ्या कारणांमूळं तो गेले काही दिवस सतत चर्चेत होता. आणि म्हणूनच तो बाकी बॉलीवूड स्टार्सना मागे टाकून दूस-या स्थानी पोहोचलेला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!