Type to search

Featured हिट-चाट

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांविरोधात तक्रार

Share
अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांविरोधात तक्रार, Hit Chat Shilpa Shetti Raj Kundra Complient Ragister

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर पुन्हा एकदा फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा आणि इतर काहींच्या विरोधात सोने गुंतवणूक योजनेतील कथित फसवणुकीविरोधात गुरुवारी खार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. परदेशस्थ भारतीय असलेल्या सचिन जोशी यांनी काही दिवसांपूर्वी खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सोने व्यवहारात असलेल्या सत्युग गोल्ड प्रा. लि.च्या संचालकपद शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याकडे होते. त्यांनी कालांतराने पदाचा राजीनामा दिला होता. सचिन जोशी यांनी मार्च 2014 मध्ये या कंपनीकडून 18 लाख 58 हजार रुपयांना एक किलो सोने खरेदी केले होते. पाच वर्षानंतर त्या गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, 25 मार्च 2019 मध्ये त्यांची योजना संपुष्टात आली तेव्हा कंपनीचे वांद्रेतील बीकेसीतील कार्यालय बंद झाल्याचे त्यांना आढळून आले. त्याची चौकशी करताना शिल्पा शेट्टी, कुंद्रा यांनी या कंपनीच्या संचालकपदावरुन अनुक्रमे मे 2016 आणि नोव्हेंबर 2017 मध्ये राजीनामा दिल्याचे आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसून चौकशी सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!