Type to search

Featured हिट-चाट

सई रे सही! पायाला फ्रॅक्चर, पण शूटिंग सुरूच

Share
सई रे सही! पायाला फ्रॅक्चर, पण शूटिंग सुरूच, Hit Chat Sai Tamhankar Shooting Fracture

मुंबई- अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मिमी या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी राजस्थानमध्ये आहे. मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अभिनेत्री क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं शूटिंग संपवून हॉटेलवर येत असताना सईच्या पायाला दुखापत झाली.

सध्या तिच्या पायाला फ्रॅक्चर असून, अशा अवस्थेतही तिनं चित्रिकरण मात्र सुरू ठेवलं आहे. सेटवर सईची पूर्ण काळजी घेतली जातेय. याबाबत ती म्हणाली, की पायाला फ्रॅक्चर झाल्यावर पहिल्यांदा माझ्या मनात आलं, की आता मी शूटिंग कसं करणर? पण, टीमनं मला पूर्ण पाठिंबा दिल्यामुळे मी चित्रिकरण करू शकतेय.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!