Type to search

Featured हिट-चाट

रितेश-जेनेलिया थेट बाभूळगावच्या शिवारातून

Share
रितेश-जेनेलिया थेट बाभूळगावच्या शिवारातून, Hit Chat Ritesh Jeniliya Film 17 Years Completed

मुंबई- अभिनेता रितेश देशमुखला त्याच्या जीवनाचा साथीदार मिळवून देणारा सिनेमा तुझे मेरी कसमला 17 वर्षे पूर्ण झाली. हा क्षण रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जनेलियाने खास बनवला आहे. लातूर जिल्ह्यातील आपलं मूळ गाव बाभूळगावच्या शेतात जाऊन रितेश देशमुखने जेनेलियासोबत रोमँटिक डान्सचा व्हिडीओ शेअर केला.

सोशल मीडियावर या व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकून घेतली असून हा व्हिडीओ अनेकांच्या स्टेटसवरही पाहायला मिळत आहे. रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहित आहे. तुझे मेरी कसम या सिनेमाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि पाहता पाहता या मैत्रीचं प्रेमात रुपातंर झालं.

2012 मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर दोघे जीवनाचे साथीदार बनले. आता त्यांना दोन मुलंही आहेत. आपल्याला एकत्र आणणारा सिनेमाची 17 वर्षे अविस्मरणीय बनवण्यासाठी रितेशने थेट गावचा रस्ता धरला. या सिनेमातलं लोकप्रिय गाणं पल पल सोच मे आना ना वर रोमँटिक डान्सचा व्हिडीओ त्याने शेअर केला.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!