नको चुकीचे डाएटींग

नको चुकीचे डाएटींग

नवीन वर्षातील संकल्प किती पाळत आहात, याबाबत आपल्यालाच विचार करावा लागेल. वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत असाल. पण डायटिंगच्या नावाखाली आपल्याकडून काही चुकाही होत असतील. कदाचित या चुकांचे आकलन होतही नसेल. त्याचे साइडइफेक्ट जाणवू लागल्यास संपूर्णपणे डायटिंग प्लॅन बंद करण्याची गरज नाही. त्यातील चुका दुरुस्त केल्यास डायटिंगचे योग्य रितीने पालन होऊ शकते.

ब्रेकफास्टमध्ये अक्रोड : एका अभ्यासानुसार ब्रेकफास्टमध्ये अक्रोडचा समावेश केला ते खाद्य आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. अन्य क्रिस्पी, क्रेकर्सच्या तुलनेत अक्रोड खालल्याने बराच काळ भूक लागत नाही. यात पौष्टिक तत्त्व आणि फयबरचा समावेश असतो. मात्र सुका मेव्यात कॅलरिज आणि सॅच्यूरेटेड ङ्गॅटही अधिक असते. एक मुठभर शेंगदाण्यात 150 कॅलरी असतात.

कॅलरिज पिणे : जर संपूर्ण दिवस खाण्याऐवजी चहा आणि कॅपिचिनो कॉफी घेत असाल तर वेळीच सावध राहा. एका कॅपिचिनो म्हणजे 120 कॅलरी आणि 8 ग्रॅम ङ्गॅट असते. 8 कपच्या दूधातही 400 कॅलरीज असतात. चहा आणि कॉफीमुळे वजन वाढत नाही, या भ्रमात राहू नका. यात स्किम्ड मिल्कचा वापर करुन हर्बल चहाचा उपयोग करा.

डायट ड्रिंक्स : विविध अभ्यासानुसार डायट ड्रिंक्स हे झिरो कॅलेरिज ड्रिंक्सपेक्षा चांगले असते. झिरो कॅलरीजमधील कृत्रिम स्वीटनर्स हे पचनक्रियेवर परिणाम करतात आणि त्यामुळे असमाधानी राहतो. पण डायट ड्रिंक्स अधिक खाण्याबाबत प्रोत्साहित करते. म्हणूनच फ्रूट टी घेणे ङ्गायद्याचे ठरेल.

सॅलेडची ड्रेसिंग : सॅलेडमध्ये भरपूर कॅलरी असतात. त्यात ङ्गुल फॅट आणि कॅलरिज असतात. सॅलेडच्या ड्रेसिंगमुळे वजन वाढते. बाजारातून विकत आणलेल्या फ्रेंच ड्रेसिंगमध्ये प्रति चमचा 70 कॅलरिजचा समावेश असतो. एवढेच नाही तर घरातही तयार केलेल्या सॅलेड ड्रेसिंगमध्ये तेल आणि विनेगर किंवा लेमन ज्यूसच्या माध्यमातूनही एकावेळी शंभर कॅलरी घेतो. त्यामुळे घरातच पोषक सॅलेड तयार करा.

सीडस टॉपिंग्स : चांगल्या डायट प्लॅनमध्ये कधी कधी खाण्याची मूभा द्यायला हवी. जर आपण 80 टक्के चांगले भोजन करत असाल तर 20 टक्के आपण जीभेचे चोचले पुरवू शकतो. त्यामुळे आपण काही वेळा चॉकलेट किंवा एक ग्लास वाइन घेऊ शकतो. सनफ्लॉवर, तीळ आणि अन्य सीडस हे पुडिंगला क्रंची करते. त्याचा योगर्ट आणि सॅलेडमध्ये देखील वापर होतो. एका टेबल स्पून सनफ्लॉवर सीडमध्ये 93 कॅलरी असतात. त्यामुळे सॅलेडमध्ये सीडस वापरत असाल तर मुठभर सीडस घेण्याऐवजी चमच्याएवढेसीडस घ्यावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com