Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमैत्रीत नो थँक्स, नो सॉरी

मैत्रीत नो थँक्स, नो सॉरी

मैत्री करणे सोपे आहे, परंतु ती टिकवून ठेवणे कठिण आहे. कारण मैत्रीत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध अमेरिकी समालोचक वॉल्टर विनचेल यांनी मैत्रीची व्याख्या सांगितली आहे. जेव्हा सर्व जग साथ सोडत असते, तेव्हा एक प्रामाणिक मित्र त्याच्यासोबत राहत असतो. टेलर कोलारिजच्या मते, प्रेम हे एखाद्या ङ्गुलासारखे असते आणि मैत्री ही झाडाप्रमाणे. मैत्री केवळ संबंधावर आधारलेली नसून एकमेकांचा विश्‍वास, सन्मान, आदरभाव, समाधान याचे अनोखे मिश्रण मानले जाते. आजच्या अतिशय धावपळीच्या युगात मैत्रीचे महत्त्व आणखीच वाढले आहे.

नामांकित विद्यापीठांचे मत : मानसोपचार तज्ञ म्हणतात, की आयुष्यात मित्राचे महत्त्व नाकारता येणार नाही. मित्र असणे खूपच गरजेचे आहे आणि त्याचवेळी चांगल्या मित्राची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. चांगला सहवास हा आपला विश्‍वास वाढवण्याचे काम करतोच, त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासही होत असतो. परंतु काही तज्ञांचे दावे आश्‍चर्यकारक आहेत. साधारणपणे कुटुंबातील सदस्यांचा डिएनए हा मेळ साधणारा असतो. परंतु अमेरिकेतील संशोधनानुसार मित्राचा डीएनए देखील कुटुंबातील सदस्याप्रमाणेच समान असतो. यासाठी यूनिव्हर्सिटी ऑङ्ग कॅलिङ्गोर्निया आणि येल यूनिव्हर्सिटीच्या संशोधनात 1932 लोकांची डीएनएची चाचणी केली. त्यात सुमारे 30 वर्षाच्या संबंधांचे आकडेवारी गोळा केली. त्यात म्हटले की, जे जिन्स एकमेकांना समजून घेण्यासाठी सक्रिय असतात, ते मित्रातही आढळून येतात.

- Advertisement -

मित्राचे नियम : अर्थात मित्रात कोणतेही नियम, अटी नसतात. मित्रासाठी जीवाची बाजी लावणारे लोक आपण वाचले किंवा ऐकले असतील. आजही वर्षानुवर्षे मैत्रीचे पालन करणारी मंडळी आपल्या सभोवताली आहेत. परंतू काही गोष्टींच्या आधारे आपण मैत्रीला आणखी टिकावूपणा देऊ शकतो. मित्राच्या पाठीमागे तेवढेच बोला, जेवढे आपण त्याच्यासमोर बोलतो. कारण काही जणांना आपली मैत्री आवडत नाही, त्यामुळे एकमेकांविरुद्ध बोलून मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला जातो. (राजकुमार- दिलीपकुमार यांचा सौदागर आठवतोय का) परंतु आपण एकमेकांवर विश्‍वास ठेऊन मैत्री निभावण्याचा प्रयत्न करायला हवा. गैरसमज होणार नाहीत यासाठी मनातील सर्व शंका, प्रश्‍न मित्रांसमोर मांडत राहा. संशयाने वातावरण कलुषित होते आणि अचानक आपल्या तोंडून एखादा वाईट शब्द जातो. त्याचे खोलवर परिणाम होतो आणि मैत्रीत फूट पडते.

अचूक आणि वास्तविक सल्ला : अडचणीत सापडलेल्या मित्राला चांगला, अचूक आणि उपयुक्त ठरेल, असाच सल्ला द्या. त्याला आपला सल्ला वाईट जरी वाटला तरी त्यावर आपण ठाम राहा. गोड बोलून त्याचे समाधान करण्याऐवजी कडू बोलून त्याला संकटातून वाचवा. आपण वेळ मारुन नेण्यासाठी कोणतेही सल्ले दिल्यास कालांतराने तो अडचणीत येईल. चांगला मित्र हा आपल्या मित्राचा आनंद दुप्पट आणि दु:ख निम्म्याने कमी करत असतो. मैत्रीत अहंकाराला मध्ये आणू नका. मी नेहमीच त्याच्या घरी का जावू. तो का नाही येऊ शकत. या गोष्टी मैत्रीत बाधा आणतात.

चांगला श्रोता व्हा : अनेकदा मित्र आपल्याकडे अडचणी दूर करण्यासाठी येतात. या आधारावर मानसिक आधार मिळतो. अशावेळी त्याची निराशा होणार नाही, याची खबरदारी घ्या. त्याचे संपूर्ण म्हणणे काळजीपूर्वक ऐका. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास तो आणखीच नाराज राहिल. मित्रात कोणी मोठे आणि लहान नसते. आपण मित्रापेक्षा मोठे असू आणि कदाचित आर्थिक, सामाजिक अडचण आल्यास आपण बिनधास्तपणे मित्रांसमोर म्हणणे मांडा. वयानुसार, चेहरा किंवा सामाजिक स्तर पाहून मैत्री होत नाही तर विचाराच्या आधारावर मैत्रीचे बंध जोडले जाते.

तज्ञ काय म्हणतात? : या तज्ञांच्या मते, एकाच जिन्सच्या रचनेत राहणारे नागरिक एकाच वातावरणाकडे आकर्षित होत असतात आणि ते एकमेकांना योगायोगाने भेटतात. मैत्री ही केवळ भावनेच्या पातळीवर जोडलेली नाही तर शास्त्रीय आधाराचा घटकही देखील तितकाच जबाबदार आहे. काही तज्ञांच्या मते, आजच्या जीवनशैलीत व्हर्च्युअल वर्ल्डचा प्रभाव वेगाने वाढत चालला आहे. परिणामी सामाजिक जीवनात मित्रांची संख्या कमी होत चालली आहे. आजच्या आभासी वातावरणात मित्रांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु त्यांच्या सोशल लाइङ्गशी काही देणेघेणे नाही, हे तितकेच खरे.

- Advertisment -

ताज्या बातम्या