Friday, April 26, 2024
HomeUncategorizedघराची किल्ली सर्वांकडे

घराची किल्ली सर्वांकडे

सातच्या आत घरात ही परंपरा अनेकांकडे पाहवयास मिळते. बाहेरच्या अप्रिय वातावरणाचा मुलांवर परिणाम होऊ नये, असा प्रामाणिक प्रयत्न पालकांचा होतो. परंतु प्रत्येकवेळी मुलांना धाकात ठेवणे हे देखील योग्य नाही. त्याचे विपरित परिणाम मुलाच्या आयुष्यावर होतो. हे समजून घेण्यासाठी एक प्रसंग जाणून घेऊ. आज प्रियांकला घरी येण्यास उशीर झाला. रात्री 12 वाजता घराच्या पायर्‍या चढताना त्याचे पाय लटपटू लागले होते. अर्थात तो खूपच सामान्य मुलगा होता. मात्र ऑफीसमध्ये पार्टी असल्याने त्याला घरी यायला उशीर झाला. घरात वादंग होणार, याची त्याला कल्पना होती. प्रत्यक्षात रात्री नऊ नंतर घरातील एकही व्यक्ती बाहेर नसेल, असा नियम निश्‍चित करण्यात आला होता. नियम मोडल्यास शिक्षा होईल, याची जाणीव प्रियांकला होती. पहिल्या बेललाच आईने दरवाजा उघडला. अपेक्षेप्रमाणे आई संतापलेली होती. प्रियांक घरात गेला, तेव्हा आईने जोरात दार लावले. त्या रागातच बोलल्या. लवकर खोलीत जा आणि मी जेवण्याचे ताट आणते. वडिलही खूप चिडलेले आहेत. प्रश्‍न असा की, एखादा नोकरदार तरुण मुलगा ऑङ्गिसमध्ये पार्टी असल्याने उशिरा येत असेल तर त्याला रागावणे कितपत योग्य आहे. चांगले वाईट न कळण्याइतपत आता तो लहान राहिलेला नाही. तो जबाबदारीही ओळखून आहे. अशा प्रकारचे निर्बंध आजही अनेक ठिकाणी दिसतात. त्यास मुली आणि सूना देखील अपवाद नाहीत.

गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप : नाशिकमध्ये राहणारी आश्‍विनी शर्मा म्हणते की, आमच्याकडे घराची किल्ली आजीकडे असते. त्यामुळे एखादा मुलगा उशिरा आला तर त्याची पिटाई होते. याच कारणामुळे मी कॉलेजनंतर डान्स क्लासला जावू शकत नाही आणि मित्रांच्या पार्टीलाही जावू शकत नाही. थोडाही उशिर झाला तर जीव टांगणीला लागतो. गुदमरल्यासारखे होते. काही करण्याची इच्छा मरुन जाते, असे आश्‍विनी म्हणते. दोन मुलांची आई कनुप्रिया देखील आपली कहानी सांगते. त्या म्हणतात, लग्नाच्या दहा वर्षानंतरही आजही पतीबरोबर एकदाही लेटनाइट मूव्हीवर किंवा पार्टीला जावू शकले नाही. एकदा मी मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. घरी येण्यास उशिर झाला तर सासूबाई दारातच बसल्या होत्या. तत्पूर्वी दहा वेळेस फोन करुन घरी किती वाजता येणार , अशी विचारणा केली. घरी आल्यानंतर तर त्यांनी संपूर्ण घर डोक्यावर घेतले. आजच्या काळातही अशी स्थिती अनेकांच्या घरात दिसून येते. अवेळी घरी येताना अनेकांच्या मनात धडकी भरते. अर्थात असे वातावरण योग्य आहे काय? घराच्या किल्ल्या प्रत्येक सदस्याकडे असाव्यात असे वाटत नाही का. दुसर्‍यांना डिस्टर्ब न करता घरात जाणे हे अतिशय सोयीचे ठरते. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधून एखादा मुलगा घरी लवकर आला तरी त्याच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. शेवटी त्याचेही ते घर आहे. तोही घरात कधीही बिनधास्तपणे येऊ शकतो.

- Advertisement -

जाचक निर्बंध हानीकारक : कुटुंबाचा अवास्तव धाक देखील काहीवेळा हानीकारक ठरतो. मुलांकडून गैरकृत्य होण्याची शक्यता राहते. त्याचा जीव गुदमरु शकतो. त्याला मोकळीक हवी, स्वातंत्र्य हवे असते. सतत धाकात राहिल्याने तो बंडही करु शकतो. म्हणूनच मुलांवर चांगले संस्कार देणे, चांगल्या वाईटाची जाणीव करु नये, घराची स्थिती एाळखून त्याच्यावर जबाबदार्‍या टाकणे, हे घरातील कर्त्या किंवा ज्येष्ठाचे काम आहे. परंतु प्रत्येकवेळी आपण चौकीदाराच्या भूमिकेत राहणे चुकीचे ठरते. त्यालंा आपल्या मनाप्रमाणे राहण्याची मुभा असायला हवी. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण राहणार नाही, याची खातरजमा करा. मुलांवर विश्‍वास टाका. त्याने जर जबाबदारी पार पाडली नाही तर त्याच्या सवलतीत कपात करा. आईवडिलांकडे पाहून, शिकूनच मुले कृती करत असतात. मुलांसाठी रोल मॉडेल व्हायला हवे. मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ नये.

स्पेस गरजेचा : अनेक पालक मुलांवर किरकोळ गोष्टींवर रागवत असतात. एवढेच नाही तर घरी उशिरा येणे, कोणाशी बोलण्यावरून किंवा मनाप्रमाणे यश न मिळाल्याने ते रागवत असतात. दुसर्‍यासमोर त्याचा अपमान करत असतात. अशा प्रकारची कृती ही दोघांच्या संबंधांवर विपरित परिणाम करणारी ठरते. मुलांच्या विकासालाही ही कृती अडसर ठरते. त्यामुळे मुलांना थोडी स्पेस द्या. मुलांवर आरडाओरडा करण्यापेक्षा त्याच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या वयानुसार विचार करण्याचा प्रयत्न केला. घरी उशिरा येण्याचे कारण समजून घ्या. रागावर नियंत्रण ठेऊन मुलाला सौम्य आवाजातच संवाद साधा. पालक नाही तर मित्र म्हणून त्याच्याशी व्यवहार करा. त्याच्या बोलण्याकडे आणि अडचणीकडे दुर्लक्ष करु नका. एखादी चूक झाल्यास त्याला इशारा देत सोडून द्या. जेणेकरून तो भविष्यात पुन्हा चुक करणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या