Type to search

Featured हिट-चाट

करिना आणि सारा यांच्यात ‘सोशल’ दुरावा; चर्चेला उधाण

Share
करिना आणि सारा यांच्यात ‘सोशल’ दुरावा; चर्चेला उधाण, Hit chat Kareena Sara Problems Social,

मुंबई- चाहत्यांच्या इच्छेखातर अभिनेत्री करिना कपूरनं इन्साग्रामवर एन्ट्री केल्यानंतर रोजच तिच्या पोस्टची चर्चा सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत करिनाच्या फॉलोअर्सची 17 लाखांच्यावर पोहोचली आहे. करिनाच्या फॉलोअर्समध्ये तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. असं असलं तरी बी टॉऊनमध्ये सध्या वेगळीच चर्चा सुरू आहे.

ती म्हणजे करिनाला तिच्या कुटुंबातील इतर सदस्य, चाहते अन् अनेक सेलिब्रिटी फॉलो करत असताना करिनाची सावत्र मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान ही मात्र तिला फॉलो करत नाहीए. सारा करिनाला फॉलो करत नाहीए…तसंच करिनानं देखील साराला फॉलो केलं नाहीए. करिनानं साराचा भाऊ इब्राहिमला फॉलो केलं आहे.

यामुळं या दोघींमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. करिनाला फॉलो करणार्‍या सेलिब्रिटींमध्ये करिश्मा कपूर, सोहा अली खान, इब्राहिम अली खान, सोनम कपूर, मलायका अरोरा, आलिया भटसह इतर अनेकांचा समावेश आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!