Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

प्रदर्शनातून उलगडला एसटीचा इतिहास; फिरत्या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Share

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एस. टी. चा इतिहास व झालेले परिवर्तन सर्व प्रवाशांना माहीत व्हावे यासाठी ‘वारी लाल परीची’ हे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास विद्यार्थी व प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला. शहरातील जुने सीबीएस येथे मंगळवारी या लाल परीचे फिरते प्रदर्शन दाखल झाले.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक डी. आर. तिरोडकर, एसटीचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद, यंत्र अभियंता मुकुंद कुवर, विभागीय सांख्यिकी अधिकारी राकेश पवार, आगार व्यवस्थापक के. एल. पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद वाक्य असलेल्या एसटीच्या बदलाचे विविध टप्पे, प्रशासांसाठी दिल्या जाणार्‍या सेवासुविधा व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. या फिरत्या प्रदर्शनास विविध शाळांच्या बाराशे ते पंधराशे विद्यार्थी व प्रवाशांनी भेट दिली.

राज्यातील 36 जिल्ह्यांतील पन्नास शहरांमधून परिवहन महामंडळाचे हे फिरते प्रदर्शन जांणार आहे. बुधवारी हे प्रदर्शन मालेगाव आणि तेथून पुढे नंदुरबार व धुळ्याकडे जाणार आहे.

प्रदर्शनात लाल-पिवळ्या बसेसपासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट तसेच जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फलक, जुनी स्थानके, तिकिटे, आदींची सचित्र माहिती देण्यात आली आहे.

मागील काही वर्षांमध्ये बससेचा आकार, रंगसंगती आणि अंतर्गत रचनेत करण्यात आलेला बदलही चित्राच्या माध्यमातून दर्शवण्यात आला आहे.

‘बस फॉर अस’ फाऊंडेशनचे रोहित धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी यावेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शहरातील रुंग्ठा हायस्कूल, सारडा कन्या विद्यालय, मराठा विद्यालय, अभिनव विद्यालयाच्या जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देत लाल परीची माहिती घेतली. प्रदर्शनाला इतर प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!