Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात

Share

देसाई यांना जिल्हा बंदी घालण्याचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला त्यांनी विरोध केला होता. दरम्यान, जातीयवाद पसरविणार्‍या हिंदूराष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना जिल्हा बंदी करावी, अशी मागणी सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधी सर्वधर्मिय कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन साहेबान जहागीरदार यांनी पोलीस अधिक्षकांना दिले.

नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात राज्यस्तरीय निषेध सभेचे आयोजन करणत आले होते. ही सभा म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असा आरोप करत देसाई यांनी या सभेला विरोध केला आहे. सभास्थळी जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. देसाई यांनी ईदगाह मैदानात होत असलेल्या सभेला विरोध करत जिल्हाधिकारी यांच्याकडे रॅलीला परवानगी मागितली होती. तोफखाना पोलिसांनी ती नाकारली. त्यानंतर ते निर्णयावर ठाम राहिले.

औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहातून त्यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निवडक कार्यकर्त्यांसह पोहचले. त्यांनी ईदगाह मैदानात होत असलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधातील सभेला विरोध दर्शविणारे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी सभास्थळी जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना बोलून दाखविला. शहर पोलिसांनी त्यांना समज दिली. तरी देखील ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.

शहर पोलीस अधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी देसाई यांना ताब्यात घेतले. देसाई यांच्यासह सुमारे दहा ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले याची माहिती हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!