हिंद सेवा मंडळाच्या घटनेबाबतच्या याचिकेचा निकाल मंडळाच्या बाजूने

0
हिंद सेवा मंडळाची घटनेबाबतच्या याचिकेचा निकाल नुकताच मंडळाच्या बाजूने लागला. याकामी बहुमोल सहकार्य करणारे अ‍ॅड.श्रीराम भारदे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करुन आभार मानतांना अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक. समवेत सचिव सुनिल रामदासी, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, संचालक प्रा.मकरंद खेर, अजित बोरा, मधुसूदन सारडा, डॉ.पारस कोठारी, बी.यु.कुलकर्णी, व्यवस्थापिका सुवर्णा देव, कैलास बालटे आदी.

नगर टाइम्स,

अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या घटनेबाबत काही वर्षांपूर्वी विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकाचा निर्णय लागला असून, धर्मदाय उपायुक्त श्रीमती हि.का.शेळके यांनी मंडळाच्या बाजूने निकाल दिला आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत हिंद सेवा मंडळाचे सचिव सुनिल रामदासी यांनी सविस्तर माहिती दिली. रामदासी म्हणाले, हिंद सेवा मंडळाची घटना वैद्य कि अवैध असा प्रश्न उपस्थित करुन विरोधकांनी याचिका दाखल केली होती. मंडळाची मंजुर घटनेची प्रत उपलब्ध नसल्याने इंग्रजी घटना मराठीत भाषांतरीत करुन 1988 साली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यास तत्कालीन पदाधिकार्यांनी मंजुरी मिळविली होती.

1988 सालच्या या सभेचे इतिवृत्त न्यायालयात पुरावा म्हणून दाखल केले. तसेच त्या सभेस उपस्थित असलेले मंडळाचे कर्मचारी, सभासद विलास साठे यांची साक्ष महत्वाची ठरली. 23 वर्षे चाललेल्या या खटल्याबाबत मंडळाने वेळोवेळी विविध दाखले पुरावे न्यायालयात सादर केले. धर्मदाय उपायुक्त श्रीमती हि.का.शेळके यांनी दि.13 ऑगस्ट 2018 रोजी या याचिकेवर अंतिम निकाल देत हिंद सेवा मंडळाच्या बाजूने निकाल दिला आहे. धर्मदाय उपायुक्त श्रीमती हि.का.शेळके या याचिकेवर निकाल देतांना म्हटले आहे की, ज्यावेळेस न्यासाच्या घटनेत बदल झाला, त्यावेळी कोणाचाही विरोध नसल्याने तसा ठराव पारित करण्यात आला व त्यानंतर 2011 मध्ये कार्यकारी मंडळाची सभा घेऊन घटनेत झालेल्या बदलचा बदल अर्ज दाखल केलेला नसल्याने तो दाखल करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

याचा विचार करता प्रस्तुताचा बदल म्हणजे, न्यासाच्या इंग्रजी ऐवजी मराठी घटना मंजूर करणे ही बाब केवळ औपाचारिक असल्याने व त्यामुळे न्यासाच्या व्यवस्थापनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, परंतु न्यासाचा कारभार सुरळित चालू शकेल, असे मला वाटत असल्याने अर्जदार यांनी दाखल केलेली सुधारित घटना जी आर्टिकल ङ्गकफ वर दाखल आहे. ती मंजूर करणे उचित वाटते. परिणामी प्राप्त परिस्थितीमध्ये न्यासाच्या हितासाठी अधिक खोलात न जाता वरील सुधारित घटना मी मंजूर करीत आहे. यापुढे आर्टिकल ङ्गकफप्रमाणे न्यासाची घटना राहील. असा आदेश देऊन याचिका निकाली काढली. या पत्रकार परिषदेस संचालक प्रा.मकरंद खेर, अजित बोरा, मधुसूदन सारडा, डॉ.पारस कोठारी, बी.यु.कुलकर्णी, विठ्ठल उरमुडे, विठ्ठल ढगे, व्यवस्थापिका सुवर्णा देव, कैलास बालटे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*