टोमॅटोच्या लालीने शेतकरी समाधानी

0
वणी (राजेंद्र भाटी) | प्रतिकुल वातावरण, शेतीव्यवसायाच्या खर्चात सातत्याने होणारी वाढ़, यामुळे चिंताक्रांत  बनलेल्या बळीराजाला टोमॅटोने अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे.

दिंडोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. नेहमीच बेभरवशाचा टोमॅटो यंदा मात्र भाव टिकून असल्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यात यशस्वी ठरला आहे.

अलीकडे शेतकरी शेतीत नानाविध बदल करत तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उत्पनाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. मात्र टमाटयाने अडचणीच्या काळात मदतीचा हात दिल्याने शेतकर्याच्या तोंडावर टमाट्याची लाली पसरली आहे.

तालुक्यातील पूर्व व पाश्चिम पटयात  मोठया प्रमाणावर टोमटोचे उत्पादन घेतले जाते. उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान  व तत्सम परप्रातातील  व्‍यापार्याबरोबर स्थानिक व्यापारी खरेदी केंद्रावर टमाटा खरेदीसाठी लगबगीने अग्रकम देतात.

गुजरात राज्यात अहमदाबाद सुरत बिलीमोरा नवसारी  येथे टमाटा व्यापारी पाठवितात लाखो रूपयांची उलाढाल होते तसेच आसाम कोलकता गोहाटी कानपुर या ठिकाणीही मागणी प्रमाणे माल अडत्याच्या माध्यमातुन जातो.

दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे फाटा खोरिफाटा दिडोरी वणी या ठिकाणी व्यापारी व उत्पादक यांचेत खरेदी विक्रीचे व्यवहार प्रतिदिन होत असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप असलेल्या ठिकाणी रोखीच्या व्यवहारास अग्रक्रम दिला जावा अशी अपेक्षा उत्पादकांची असते व ती रास्त असुन व्यापारी पूर्ण करण्याकारिता प्रयत्नशील असतात वर्षानुवर्षे व्यापार करणारे स्थानिक व्यापारी व उत्पादक यांच्यात असलेल्या विश्वासार्हतेवर खरेदीविक्री ची गति अवलंबुन असते.

अनेकदा  व्यापारी माल खरेदी करून परांगदा  होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे शेतकरी सांगत आहेत. दोन पैसे कमी जरी मिळाले तरी चालेल पण माल घेतला कि पैसे द्यावे अशी त्यांची अपेक्षा असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

*