गुजरातच्या मागणीमुळे कोथिंबीर भाव खातेय

0

नाशिक । दि. 27 सोमनाथ ताकवाले
गुजराती व्यंजनात महत्वाचा घटक असलेली कोथिंबिर स्थानिक बाजारपेेठेत उपलब्ध होत नसल्याने, ही मागणी पुर्ण करण्यासाठी गुजरातच्या व्यापार्‍यांनी नाशिकचे बाजार आवार कोथिंबिर खरेदीसाठी गाठले आहे.

मागणीमुळे कोथिंबीरीने दहा रुपये जुडीवरून थेट 200 रुपये जुडी दरावर उडी घेतलेली आहे. त्यामूळे टिकाऊ कालावधी अल्प असलेल्या कमी असलेल्या छाणी कोथिंबीरीला तेजी आली आहे.

बाजार समिती आवारात पालेभाजीची टंचाई आहे. कमी आवक आणि मागणी अधिक असल्याने दर आपोआपच वधारलेले आहे. त्यात सर्वाधिक दर कोथिंबिरीला मिळत आहे.

गेल्या 15 दिवसांपासून कोथिंबिरीची जुडी प्रतवारीनुसार लिलावात 20 ते 200 रुपये दराने विक्री होत आहे. त्यामूळे किरकोळ बाजारात कोथिंगिरीच्या दोन काड्या दहा ते 15 रुपयांना ग्राहकांना खरेदी करण्याची वेळ आलेली आहे.

नाशिकमध्ये जुडी प्रमाणात कोथिंबिरीची खरेदी करून गुजरातचे व्यापारी तो माल गुजरातच्या भाजीबाजारात किलो या प्रमाणामध्ये वजनावर विक्री करतात.

त्यामूळे नाशिकला 100 ते 200 रुपये जुडी दराने खरेदी केलेली कोथिंबिर गुजरातला विक्री करताना व्यापार्‍यांना परवडतो.

मात्र मागणीच्या प्रमाणात कोथिंबिर उपलब्ध होत नसल्याने, छाणी या जाड काडीच्या आणि रुंद पाल्याच्या कोथिंबिरीला सध्या वाढलेल्या दरामुळे तेजीचे दिवस आले आहे.

ही कोथिंबिर वाहतूकी दरम्यान चारपाच तासाच्या कालावधीत गरम होऊन पाणी सोडते. त्यामूळे प्रवासा दरम्यान कोथिंबिर कुजते.

मात्र, अशी परिस्थिती असली तरी मार्केटमध्ये सध्या याच कोथिंगिरीची आवक सर्वाधिक आहे. त्यामूळे मागणी असलेल्या भाजीबाजारात कोथिंबिरीची पुर्तता करण्यासाठी व्यापार्‍यांकडून लिलावात छाणी कोथिंबिरीच्या खरेदीला पसंती आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत दोन दिवसात कोथिंगिरीची आवक एक लाख 65 हजार जुड्या एवढीच झालेली आहे.

त्यात गावठी कोथिंबिरीची आवक हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढ्या जुड्यांची आहे. तर 99 टक्के कोथिंबिर ही छाणी प्रकारातील आहे. गावठी कोथिंबिरीच्या जुडीला 150 ते 200 रुपये जुडी दर लिलावात मिळत आहे.

तर छाणी कोथिंबिरीचा पोत, जुडी बांधणी आकार आणि टवटवी पाहून लिलावात 1000 ते 9000 रुपये प्रति शेकडा दराने विक्री होताना दिसत आहे.

बाजार आवारातून कोथिंबीर मुंबई, गुजरात, मध्यप्रदेशला पाठवणार्‍या व्यापार्‍यांची संख्या अधिक आहे. सध्या जेवढ्या जुड्या बाजार आवारात विक्रीसाठी येत आहे.

त्यापेक्षा कित्येक पटीने कोथिंबीरच्या जुड्यांची मागणी परपेठेतील बाजारपेठत असते. ती सध्या पूर्ण होत नसल्याने कोथींबिर भाव घात आहे.

LEAVE A REPLY

*