Type to search

Breaking News देश विदेश

BREAKING : जम्मू-काश्मिरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा संपुष्टात, लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश

Share

नवीदिल्ली-  जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविण्याची शिफारस गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेतील निवेदनात केली. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. कलम 370 चा खंड 1 वगळता अन्य सर्व बरखास्त केल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. जम्मू-काश्मिर विधानसभेसह केंद्राशासित प्रदेश, लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करत असल्याचे त्यांनी घोषित केले. यासोबत जम्मू-काश्मिरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा संपुष्टात आला आहे. जम्मू-काश्मिरचे आता दोन भाग होणार. त्यामुळे आता दोन केंद्रशासित प्रदेश तयार होतील. सोबतच भौगोलिक स्थितीही बदलणार आहे.

काश्मिर खोर्‍यातील स्थितीवरून सोमवार सकाळपासून राजधानी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह थेट संसदेत पोहचले आहेत. सकाळी 11 वाजता ते काश्मिरबाबत निवेदन करणार आहेत. काय निर्णय झाला, याची उत्सुकता देशभर आहे.
दरम्यान, काश्मिर खोर्‍यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी कडा बंदोबस्त लावला आहे.

सीआरपीएफच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काश्मिर नेत्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोाबईल आणि लॅण्डलाईन सेवा बंद करण्यात आली आहे. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी व्टिटरवरून आपण नगरकैदेत असल्याचे म्हटले आहे.

केंद्राने राज्यांना हाटअलर्टवर ठेवले आहे. विरोधी पक्ष राष्ट्रपतींची भेट घेवून स्थगन प्रस्तावाच्या विचारात आहेत. लद्दाखमध्ये मात्र काही प्रमाणात बंदोबस्त शिथील आहे. दरम्यान, गृहमंत्री शाह 11 वाजता राज्यसभेत तर 12 वाजता लोकसभेत निवेदन करणार आहे.

– पंतप्रधान मोदी संसदेत पोहचले

– राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ

– गृहमंत्री शाह यांच्याकडून जम्मू-काश्मिर विधेयक मांडण्यास सुरूवात

-काश्मिरातील काही भागात कर्फ्यु

– काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी घेतला आक्षेप

-काश्मिरवर कोणत्याही चर्चेस तयार- शाह

bकाश्मिरमधून कलम 370 हटविण्याची शिफारस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!