अशोक लांडे खून प्रकरण : आ. शिवाजी कर्डिलेंना हायकोर्टाची नोटीस

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – अशोक लांडे खून प्रकरणात निर्दोष सुटका झालेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नोटीस काढली आहे. कर्डिले यांच्या निर्दोष सुटकेला फिर्यादी शंकर राऊत यांनी मुंबई हायकोर्टात अपील केले असून त्यानंतर ही नोटीस काढण्यात आली.
याच प्रकरणात काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्यांचे पुत्र माजी महापौर संदीप, सचिन, अमोल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कर्डिले यांनी अशोक लांडे यांचे वडील भीमराज लांडे, मयताची पत्नी अर्चना हिस साडेचार लाख रुपये देऊन गप्प राहण्यास सांगितले, असा राऊत यांचा आरोप आहे. हे पैसे देण्याच्या प्रक्रियेत साक्षीदार अमोल जाधव, पोलीस कर्मचारी कल्याण गाडे यांचाही सहभाग होता, असे राऊत यांनी सांगितले.

साक्षीदार दिलीप लांडे, अरुण पवार, अर्चना लांडे, विनायक पवार हे कोर्टात फितूर झाले. परिणामी कर्डिले यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होण्यास कायदेशीर अडचणी वाढल्या. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आमदार कर्डिले यांची नाशिक कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असे राऊत यांचे म्हणणे आहे. या सुटके विरोधात व फितूराविरुध्द परज्युरीची कार्यवाही नाशिक कोर्टात सुरू झाली आहे.

कर्डिले यांच्या निर्दोष सुटकेविरूध्द मुंबई उच्च न्यायालयात फिर्यादी शंकर राऊत यांनी अपील दाखल केले आहे. 19 एप्रिल 2017 रोजी न्यायमूर्ती ए.एम.बदर यांच्यासमोर त्यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती बदर यांनी शिवाजी कर्डिले, तपासी अधिकारी यांना नोटीस बजवाव्यात असे आदेश सरकारला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 09ऑगस्ट 2017 रोजी होणार आहे. फिर्यादी राऊत यांच्यावतीने अ‍ॅड. जितंेंद्र गायकवाड, ज्येेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. अनिलकुमार पाटील काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*