जीएसटीनंतर हिरो मोटरसायकलच्या किमती घटल्या

0

मारुती सुझुकीनंतर आता हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या लोकप्रिय मोटारसायकल मॉडेलच्या किमती घटविल्या आहेत.

त्यामुळे आता या मॉडेल्स वर 400 ते 1800 रुपयांची कपात होणार आहे.

जीएसटीचा लाभ ग्राहकांना मिळवा म्हणून कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

हे दर प्रत्येक राज्यानुसार बदलणार आहेत. मात्र हरियाणा सारख्या एक दोन राज्यात मोटारसायकलच्या किंमती वाढणार आहेत. कारण तिथे जीएसटी पूर्वी कमी कर होते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

याशिवाय काही प्रीमियम सेगमेंट मॉडेलच्या किमतीत 4 हजार रुपयांपर्यंत घट होणार आहे.

LEAVE A REPLY

*