Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : नाशिक शहरात हेल्मेट सक्ती; कुठे बाचाबाची तर कुठे जागरूकता

Share

नवीन नाशिक | वार्ताहर

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक शहरातील वाढते अपघात आणि त्यात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरात हेल्मेट सक्तीचा इशारा दिला होता.

त्यानुसार, आज सकाळपासून शहराच्या विविध भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ई-चलन मशिन, जीएन पावती पुस्तक, बरेथ अँनालायझर, व्हिडीओ कँमेरा पथकासह विना हेल्मेट आणि कागदपत्र नसलेल्या चालकांवर कारवाई केली.

अचानक चौकाचौकांत करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक ठिकाणी पोलिस आणि नागरिक संघर्ष बघयला मिळाला.  शहर पोलिसांतर्फे आजपासून हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवरील कारवाईसाठी तब्बल पाचशे पोलीस रस्त्यावर उतरले असून शहरातील विविध भागात ते कारवाई करत आहेत.

शहरात 26 ठिकाणी नाकाबंदी करून बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट आणि सीटबेल्ट नसल्याने दरवर्षी सुमारे 100 चालकांचा अपघाती मृत्यू होत असतो. हे टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियमभंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

यादरम्यान, नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्थांनी हेल्मेट जनजागृती मोहीम आजही कारवाईदरम्यान हाती घेतली असून हेल्मेट घालण्याचे फायदे या संस्थाकडून दिले जात आहेत.

हुलकावणी देणारयांनो सावधान

कारवाईला सामोरे न जाता पोलिसांना हुलकावणी पळ काढणाऱ्या वाहनचालकांना थेट घरपोच ई-चलन पाठविण्यात येत आहे. यामुळे कुणाला वाहन तात्पुरता देणार्यांचे धाबे दणाणले आहे. घरपोच दंडाची पावती येण्यापासून बचाव करायचा असेल तर वाहतूक नियमांचा अभ्यास करून ते पाळले पाहिजेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!