Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे हेलिकॉप्टर विक्रीला

Share

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला आयकर विभागाने दणका दिला आहे. विजय मल्ल्याकडील दोन हेलिकॉप्टर आयकर विभागाने विक्रीस काढली आहेत. या हेलिकॉप्टर्सची किंमत ८ कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी यूबीएस एजी या स्विस बँकेने विजय मल्ल्याविरोधात ब्रिटनच्या हायकोर्टात दावा दाखल केला होता. कर्ज न फेडल्याने यूबीएस बँकेने मल्ल्याच्या लंडनमधील हवेलीचा ताबा मिळावा, यासाठी हा दावा दाखल केला. यानंतर आता देशातील आयकर विभागानेही विजय मल्ल्याविरोधात पावले उचलली आहेत. आयकर विभागाने मंगळवारी वृत्तपत्रात जाहिरात दिली असून विजय मल्ल्याकडील दोन हेलिकॉप्टर्सचा लिलाव केला जाणार आहे.

आयकर विभागाच्या जाहिरातीनुसार चर्चगेटमधील एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनीतील कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्यांना भारतीय चलनात बोली लावावी लागणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी ही लिलाव प्रक्रिया होईल. तर ३ नोव्हेंबर रोजी इच्छुकांना जुहू विमानतळावर हेलिकॉप्टर्सची पाहणी करता येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!