Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशकात हेलिकॉप्टर आणि ड्रोन कॅमेरा वापरावर बंदी

Share

नाशिक : शहरात पुढील आठवड्यात होणाऱ्या महत्वाच्या सभांच्या अनुषंगाने हेलिकॉप्टर आणि ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी आली आहे. काल पासून (दि. १४) ते २० सप्टेंबरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.

नाशिक शहरात पुढच्या आठवड्यात महत्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर दौऱ्यांच्या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर, ड्रोन कॅमेरा याप्रकारची साधनांवर बंदी घालण्यात आली आहे. कारण या साधनांपासून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर निर्बध लादण्यात आले आहेत.

दरम्यान या तारखांच्या कालावधीत ड्रोनद्वारे चित्रीकरण करावयाचे असल्यास संबंधित पोलीस स्टेशनची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!