Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुढील दोन दिवस नाशिकसह परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

Share
file photo

नाशिक | प्रतिनिधी

मुबईसह उपनगरांत मुसळधार पावासने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. नाशिकमधील बागलाण तालुक्यासह परिसरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाचे आगमन झाल्यावर नद्यांमध्ये धरणातून विसर्ग केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून अनेक भागांत कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 8 सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मुंबईत सध्या पावसाचा हाहाकार माजला आहे. येत्या 48 तासांतही मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याचा अंदाज काय? :

● राज्याच्या विविध भागात आठवडाभर संततधार पाऊस सुरू राहणार
● पुढील 24 ते 48 तासांत मध्य महाराष्ट्रात (जळगाव, नाशिक आणि मालेगाव) मध्यम पावसाची शक्यता
● पुण्यात हलका पाऊस राहील. मराठवाड्यातील काही भागांत मध्यम सरींची शक्यता
● त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे पाऊस पडतच राहील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!